स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य अभ्यास मंडळाच्या अध्यक्षा क्रांतीगीता ताई महाबळ यांचे नुकतेच सायंकाळी वयाच्या ६८ व्या वर्षी पुणे येथे त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. त्या बरेच दिवस आजारीच होत्या.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कार्याचा व साहित्याचा प्रचार व प्रसार करण्यात त्यांनी संपूर्ण आयुष्य व्यतित केले. हिंदू महासभा या जुन्या पक्षातर्फे त्यांनी दादर येथील मतदार संघातून अनेक वर्षांपूर्वी निवडणूक सुद्धा लढवली होती. राष्ट्रीय कीर्तनकार दिवंगत गोविंद स्वामी आफळे यांच्या त्या कन्या असून, राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे यांच्या त्या ज्येष्ठ भगिनी होत्या. त्या स्वतःही उत्तम कीर्तन करीत असत.
हे ही वाचा:
‘एनर्जी ड्रिंक’ शब्द हटवा! रेड बुलपासून पेप्सीपर्यंत सर्वांनाच नवे नियम
मी एसी रूममधला कार्यकर्ता नाही, रस्त्यावरचा लढवय्या”
ब्रांझपदकविजेत्या पॅरा पॉवरलिफ्टर झंडूकुमारला १० लाखांचे इनाम
“आंदोलन झाले म्हणून लाठीमार करण्याचा अधिकार नाही”
अनेक वर्ष सार्वजनिक जीवनात राहून त्यांनी हिंदुत्वासाठी खूप कार्य केले होते. स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य अभ्यास मंडळाचे प्रमुख कार्यवाह विनायक काळे यांनी मंडळाच्या वतीने त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
