28 C
Mumbai
Friday, July 31, 2026
घरविशेष‘एनर्जी ड्रिंक’ शब्द हटवा! रेड बुलपासून पेप्सीपर्यंत सर्वांनाच नवे नियम

‘एनर्जी ड्रिंक’ शब्द हटवा! रेड बुलपासून पेप्सीपर्यंत सर्वांनाच नवे नियम

एफएसएसएआयकडून इशारा

Google News Follow

Related

भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI) देशातील शीतपेय उद्योगावर मोठा निर्णय घेतला आहे. रेड बुल, पेप्सीको आणि इतर कंपन्यांना त्यांच्या कॅफिनयुक्त पेयांवर (Caffeinated Beverages) ‘Energy Drink’ (एनर्जी ड्रिंक) हा शब्द वापरणे ९० दिवसांच्या आत बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या कंपन्यांनी उत्पादनांच्या लेबलिंगमध्ये आवश्यक बदल करून नियमांचे पालन करावे, असे एफएसएसएआयने स्पष्ट केले आहे.

एफएसएसएआयच्या मते, भारतीय अन्न सुरक्षा नियमांमध्ये ‘Energy Drink’ अशी स्वतंत्र श्रेणी अस्तित्वात नाही. त्यामुळे अशा उत्पादनांना ‘Caffeinated Beverage’ (कॅफिनयुक्त पेय) या श्रेणीतच वर्गीकृत केले जाईल. ग्राहकांची दिशाभूल होऊ नये आणि उत्पादनाचे स्वरूप स्पष्टपणे समोर यावे, हा या निर्णयामागील उद्देश असल्याचे सांगण्यात आले आहे. या निर्णयाचा परिणाम रेड बुल, पेप्सीको आणि अशाच प्रकारची कॅफिनयुक्त पेये विकणाऱ्या अनेक कंपन्यांवर होणार आहे. या कंपन्यांना ९० दिवसांच्या आत सर्व पॅकेजिंग, लेबल, जाहिराती आणि विपणन साहित्यामधून ‘Energy Drink’ हा उल्लेख काढून टाकावा लागणार आहे. त्याऐवजी उत्पादनाला ‘Caffeinated Beverage’ म्हणूनच दर्शवावे लागेल.

एफएसएसएआयने यापूर्वीही कॅफिनयुक्त पेयांसाठी कॅफिनचे प्रमाण, इशारा (Warning Label) आणि ग्राहकांना दिली जाणारी माहिती याबाबत स्पष्ट नियम लागू केले आहेत. नियमानुसार, अशा उत्पादनांवर कॅफिनचे प्रमाण स्पष्टपणे नमूद करणे बंधनकारक आहे. तसेच मुले, गर्भवती महिला आणि कॅफिनबाबत संवेदनशील व्यक्तींनी हे पेय टाळावे, असा इशाराही लेबलवर देणे आवश्यक आहे.

हे ही वाचा:

‘नीट’ विद्यार्थ्यांच्या आत्महत्या विसरून ‘कॉक्रोच’ नेत्यांची जंगी पार्टी

अभिषेक बॅनर्जींच्या ‘सेवाश्रय’ शिबिरातील डॉक्टर-विद्यार्थ्यांची होणार चौकशी

“आंदोलन झाले म्हणून लाठीमार करण्याचा अधिकार नाही”

‘नीट’ परिक्षेत फक्त ११ गुणांनी कटऑफ हुकल्याने विद्यार्थीनीने जीवन संपवले

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, कॅफिनचे अतिसेवन केल्यास हृदयाचे ठोके वाढणे, रक्तदाब वाढणे, निद्रानाश, अस्वस्थता आणि चिंताग्रस्तता यांसारखे दुष्परिणाम होऊ शकतात. त्यामुळे ग्राहकांना उत्पादनाबाबत अचूक माहिती मिळणे अत्यंत आवश्यक आहे. एफएसएसएआयचा हा निर्णय ग्राहक संरक्षण आणि पारदर्शक लेबलिंगच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
325,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा