पुणे येथे अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने आयोजित केलेल्या ब्राह्मोद्योग स्टार्टअप कॉनक्लेव्ह २०२५ मध्ये युवा लेखक विवान कारूळकर याला गौरविण्यात आले.
या कार्यक्रमात विवान सन्माननीय अतिथी होता. महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकात पाटील यांच्या हस्ते त्याला सन्मानित करण्यात आले.
सनातन धर्म : ट्रू सोर्स ऑफ ऑल सायन्सेस हे पुस्तक विवानने लिहून विज्ञान आणि आध्यात्म यांची उत्तम सांगड घातली आहे.
हे ही वाचा:
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दीनिमित्त ‘दीपस्तंभ’चे प्रकाशन
पंतप्रधान मोदींकडून सशस्त्र दलांना ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशाबद्दल शुभेच्छा
यूपीची ‘विकसित यूपी ॲट २०४७’ या व्हिजनकडे वाटचाल
युट्यूबर मणी मेराजने महिला इन्फ्लुएन्सरला फसवले, आता दुसरे लग्न करण्याच्या तयारीत!
अवघ्या १६व्या वर्षी विवानने हे पुस्तक लिहिले आणि त्याबद्दल त्याचे विविध स्तरात कौतुक झाले. इंग्रजी, मराठी, हिंदी, गुजराती भाषेत हे पुस्तक प्रकाशित झालेले आहे.
विवानचे सनातन धर्म : ट्रू सोर्स ऑफ ऑल टेक्नॉलॉजीस हे पुस्तकही प्रकाशित झाले आहे. देशविदेशात विविध मान्यवरांनी वेळोवेळी विवानच्या पाठीवर शाबासकीची थाप दिलेली आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या पुस्तकाचे कौतुक केले असून प्रभू श्रीरामाच्या अयोध्येतील मंदिरातही प्रभू श्रीरामचरणी या पुस्तकाची प्रत ठेवण्यात आली होती. श्रीराम मंदिर ट्रस्टचे चंपतराय यांनीही पुस्तकाची स्तुती केली होती.
