आजकाल बहुतेक लोक आपला मोठा वेळ स्मार्टफोनवर घालवतात, विशेषत: सोशल मीडियावरील रील्स, व्हिडिओ आणि ई-बुक वाचनात. अलीकडील एका संशोधनात असे आढळले आहे की सलग एक तास मोबाईल स्क्रीनकडे पाहिल्याने डोळ्यांमध्ये थकवा आणि इतर समस्या उद्भवू शकतात. जर्नल ऑफ आय मूव्हमेंट रिसर्च मध्ये प्रकाशित झालेल्या या अभ्यासानुसार डोळ्यांचा ताण हा फक्त किती वेळ मोबाईल पाहतो यावर अवलंबून नसून, आपण कोणत्या प्रकारचा कंटेंट पाहतो यावरही अवलंबून असतो.
एसआरएम इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या संशोधकांनी सांगितले, “पुस्तक वाचणे किंवा व्हिडिओ पाहण्यापेक्षा रील्स पाहिल्यास डोळ्यांच्या बुबुळामध्ये अधिक बदल होतात. संशोधकांच्या मते, “सलग २० मिनिटांपेक्षा जास्त वेळ मोबाईल वापरल्यास शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. मानसिक तणावासारख्या समस्या यामध्ये समाविष्ट आहेत. मोबाईल आणि इतर डिजिटल उपकरणांमधून निघणाऱ्या ब्लू लाईटमुळे डोळ्यांचा थकवा, झोपेच्या समस्या आणि दृष्टीसंबंधी त्रास निर्माण होऊ शकतो.
हेही वाचा..
कर्नाटक धर्मस्थळ वाद : काय म्हणाले सी.टी. रवी ?
बेरोजगारी दर घसरून ५.२ टक्क्यांवर
भारतातून आय फोनची निर्यात ६३ टक्क्यांनी वाढली
पंतप्रधान मोदी यांनी सी.पी. राधाकृष्णन यांची एनडीए खासदारांशी करून दिली ओळख
या संशोधनासाठी वैज्ञानिकांनी एक स्वस्त आणि पोर्टेबल सिस्टीम तयार केली जी डोळ्यांच्या हालचाली मोजते. यात एका मिनिटात किती वेळा पापण्या लवतात, दोन पापण्यांच्या लवण्यामधील वेळ किती असतो, तसेच बुबुळाचा आकार किती बदलतो हे मोजण्यात आले. हे मोजमाप १ तास सलग पुस्तक वाचन, व्हिडिओ पाहणे आणि सोशल मीडियावरील रील्स पाहताना करण्यात आले. परिणाम असे दिसून आले की रील्स पाहताना स्क्रीनची प्रकाशमानता आणि चमक सतत बदलते, ज्यामुळे बुबुळ आकसते-फुगते. त्यामुळे पापण्या कमी लवतात आणि डोळ्यांचा थकवा वाढतो. संशोधनात ६०% लोकांना जास्त वेळ मोबाईल वापरल्यानंतर डोळ्यांचा थकवा, मानदुखी आणि हातात थकवा जाणवला. तर ८३% लोकांनी मानसिक समस्या सांगितल्या – जसे की चिंता, झोपेतील अडथळे आणि मानसिक थकवा. या समस्यांना कमी करण्यासाठी ४०% लोकांनी ब्लू लाईट फिल्टर किंवा डार्क मोडचा वापर केला.
