गणेशोत्सवानिमित्त पश्चिम रेल्वेची प्रवाशांसाठी मोठी भेट

कोकणासह विविध मार्गांवर ४२ विशेष गाड्या धावणार

गणेशोत्सवानिमित्त पश्चिम रेल्वेची प्रवाशांसाठी मोठी भेट

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची वाढती गर्दी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने विशेष गाड्यांची घोषणा केली आहे. प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मुंबई, गुजरात आणि इतर भागांतून कोकणासह विविध ठिकाणांसाठी विशेष भाड्यावर एकूण ४२ फेऱ्या चालविण्यात येणार आहेत. या विशेष गाड्यांचे आरक्षण ९ ऑगस्ट २०२६ पासून सर्व पीआरएस आरक्षण केंद्रांवर तसेच आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर सुरू होणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेच्या जनसंपर्क विभागाने दिली.

या विशेष सेवांमध्ये मुंबई सेंट्रल–ठोकूर, मुंबई सेंट्रल–सावंतवाडी रोड, वांद्रे टर्मिनस–रत्नागिरी, वलसाड–रत्नागिरी, उधना–रत्नागिरी, वडोदरा–रत्नागिरी तसेच विश्वामित्री–रत्नागिरी या मार्गांवरील गाड्यांचा समावेश आहे. या गाड्या ११ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत विविध दिवशी धावतील.

यापैकी मुंबई सेंट्रल–सावंतवाडी रोड विशेष गाडी आठवड्यातून चार दिवस धावणार असून तिच्या १६ फेऱ्या होणार आहेत. विश्वामित्री–रत्नागिरी द्विसाप्ताहिक विशेष गाडीच्या ८ फेऱ्या, तर वांद्रे टर्मिनस–रत्नागिरी, उधना–रत्नागिरी आणि विश्वामित्री–रत्नागिरी साप्ताहिक गाड्यांच्या प्रत्येकी ४ फेऱ्या होणार आहेत. तसेच मुंबई सेंट्रल–ठोकूर, वलसाड–रत्नागिरी आणि वडोदरा–रत्नागिरी या गाड्यांच्या प्रत्येकी २ फेऱ्या चालविण्यात येणार आहेत.
हे ही वाचा:
गोळ्या झाडूनही स्कॉर्पिओ थांबली नाही… जम्मू-श्रीनगर हायवेवर अलर्ट

चाकरमान्यांनो, तयारीला लागा! कोकणासाठी सोडणार ५,२२० विशेष बस

₹६० हजार कोटींच्या टप्प्याकडे स्विगीची झेप

मेटाचे अल्गोरिदम आता सरकारच्या रडारवर

या सर्व विशेष गाड्यांना बोरिवली, वसई रोड, भिवंडी रोड, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी यांसह मार्गानुसार सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, गोवा आणि कर्नाटकातील काही स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे. त्यामुळे कोकण, गोवा आणि कर्नाटकात जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

प्रवाशांच्या गरजेनुसार या गाड्यांमध्ये प्रथम वातानुकूलित, एसी द्वितीय, एसी तृतीय, एसी थ्री इकॉनॉमी, शयनयान (स्लीपर) आणि सामान्य द्वितीय श्रेणी, तसेच काही गाड्यांमध्ये अनारक्षित डबे उपलब्ध असतील. पश्चिम रेल्वेने स्पष्ट केले आहे की गाडी क्रमांक ०९०१३, ०९०१९, ०९०३०, ०९०२२, ०९११४, ०९११० आणि ०९१२४ या विशेष गाड्यांचे आरक्षण ९ ऑगस्ट २०२६ पासून सुरू होईल. या सर्व गाड्या विशेष भाड्यावर धावणार असून प्रवाशांनी वेळापत्रक, थांबे आणि डब्यांच्या रचनेची सविस्तर माहिती भारतीय रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर तपासावी, असे आवाहन पश्चिम रेल्वेने केले आहे.

गणेशोत्सवाच्या काळात दरवर्षी कोकणाकडे मोठ्या प्रमाणावर प्रवासी रवाना होत असल्याने या विशेष गाड्यांमुळे नियमित गाड्यांवरील ताण कमी होण्यास मदत होणार असून हजारो प्रवाशांचा प्रवास अधिक सुलभ आणि आरामदायी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Exit mobile version