‘एकत्र आलो आहोत, एकत्र राहण्यासाठी’

मराठी विजयी मेळाव्यात उद्धव ठाकरेंचे वक्तव्य 

‘एकत्र आलो आहोत, एकत्र राहण्यासाठी’

१८ वर्षांच्या मतभेदांनंतर दोनही ठाकरे बंधू आज एकाच स्टेजवर पहायला मिळाले. २००६ मध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या रॅलीत ते शेवटचे एकत्र दिसले होते. यावेळी शिवसेना (यूबीटी) प्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले की, ”दोघे आता एकत्र राहण्यासाठी एकत्र आलो आहोत. मराठीच्या रक्षणासाठी एकत्र आलो आहोत. एकत्र येणे हा फक्त एक ट्रेलर आहे. ही फक्त सुरुवात आहे”. वरळी येथील एनएससीआय डोम येथे हा ‘मराठी विजयी मेळावा’ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात हजारो मराठी उत्साही, लेखक, कवी आणि दोन्ही पक्षांचे समर्थक सहभागी झाले होते.

तत्पूर्वी, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे यांनी कार्यक्रमाला संबोधित केले आणि म्हणाले, “मुख्यमंत्री फडणवीस यांनी बाळासाहेब ठाकरेंना जे शक्य झाले नाही ते केले, मला आणि उद्धव यांना एकत्र आणले.” मुंबईतील २९ महानगरपालिकांमधील आगामी निवडणुकांचा संदर्भ देत शिवसेना (यूबीटी) प्रमुख आत्मविश्वासाने म्हणाले, “मी आणि राज ठाकरे मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्रात सत्ता काबीज करू.”

राज ठाकरे म्हणाले, ‘जर आमची मुले इंग्रजी माध्यमात गेली तर आमच्या मराठीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होते. जर लालकृष्ण अडवाणी यांनी मिशनरी शाळेत शिक्षण घेतले असेल तर त्यांच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले पाहिजे का? आम्ही हिंदी लादणे सहन करणार नाही. आता ते ठाकरेंच्या मुलांनी इंग्रजीत शिक्षण घेतले आहे असा मुद्दा उपस्थित करत आहेत. हा काय मूर्खपणा आहे? भाजपचे अनेक नेते इंग्रजी माध्यमात शिक्षण घेतले आहेत.

हे ही वाचा : 

काय असतात झूनोटिक आजार?

नीरव मोदीच्या भावाला अमेरिकेत अटक

सिस्टम अपग्रेडसाठी दक्षिण मध्य रेल्वेकडून १४३.३ कोटी

तांब्याचे दर ९८०-१,०२० रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचणार

ते पुढे म्हणाले, स्टॅलिन, कानमोझी, जयललिता, नारा लोकेश, आर रहमान, दक्षिणेत सूर्या, सर्वांनी इंग्रजीत शिक्षण घेतले आहे. एका वक्त्याने हिंदीत बोलायला सुरुवात केली तेव्हा रहमान यांनी व्यासपीठ सोडले. बाळासाहेब आणि माझे वडील श्रीकांत ठाकरे यांनी इंग्रजीत शिक्षण घेतले आहे, परंतु ते मातृभाषा मराठीबद्दल खूप संवेदनशील होते. बाळासाहेब ठाकरे यांनी इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेतले, परंतु त्यांनी मराठी भाषेशी तडजोड केली नाही. मराठीकडे कोणीही नकारात्मक दृष्टीने पाहू नये.

Exit mobile version