‘सैय्यारा’च्या रेकॉर्डिंगदरम्यान काय घडलं होत ?

‘सैय्यारा’च्या रेकॉर्डिंगदरम्यान काय घडलं होत ?

आपल्या आगामी चित्रपट ‘सैय्यारा’च्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत असलेले दिग्दर्शक मोहित सूरी यांनी सांगितलं की, गाण्याच्या रेकॉर्डिंग दरम्यान संगीतकार तनिष्क बागची यांनी त्यांना “गेट आऊट” म्हणजेच बाहेर जायला सांगितलं होतं. सूरी यांनी काश्मीरमधील नवोदित गायक फहीम अब्दुल्ला आणि अर्सलान निजामी यांच्या रेकॉर्डिंगमागील काही खास आठवणी शेअर केल्या.

मोहित म्हणाले, “मी तिथे होतो तोपर्यंत रेकॉर्डिंग आणि जॅमिंग सेशन्स खूपच गंभीर असायचे. त्यानंतर काय झालं, ते मला माहित नाही. एके क्षणी त्यांनी मला रेकॉर्डिंग सेशनमधून बाहेर जायला सांगितलं.”ते पुढे म्हणाले, “सगळे लोक रूममध्ये बसले होते आणि त्यावेळी तनिष्कने माझ्याकडे बघून म्हटलं, ‘सर, आता तुम्ही बाहेर जा.’” हसत हसत मोहित म्हणाले, “म्हणजे प्रत्यक्षात त्यांनी मला बाहेर जायला सांगितलं होतं. कारण त्यांना जाणवलं की हे दोघं गायक मला प्रभावित करण्याचा प्रयत्न करत होते, पण कदाचित माझ्यासमोर मोकळेपणाने गाऊ शकत नव्हते. एका अर्थाने, तनिष्क हार्ड मास्टर असले तरी दोघांनाही वाचवत होते.”

हेही वाचा..

मायानगरी सोडून गावी का स्थायिक झाले नाना पाटेकर?

संरक्षण क्षेत्रात भारत आत्मनिर्भरतेच्या दिशेने

कोथंडारामस्वामी मंदिरात तब्बल ८३ वर्षांनंतर रथयात्रा

आप, काँग्रेसने झोपडपट्टीवासियांना वर्षानुवर्षे मूर्ख बनवलं

मोहित सूरी यांनी पुढे सांगितलं, “त्याने सारखं एकच म्हणणं ठेवलं, ‘नाही, नाही, त्यांना त्यांच्या गावी डब करू द्या. तिथे ते कम्फर्ट झोनमध्ये असतील. इथे ते गडबडतील.’ ही खूपच प्रेमळ गोष्ट होती. तनिष्क बागची जणू त्यांचा वडिलांसारखा भक्कम आधार होता, त्यांना थामबून ठेवणारा आणि संरक्षित करणारा.” “मी स्वतः फारसा अडथळा निर्माण करत नाही, पण मी एक अत्यंत जिज्ञासू दिग्दर्शक आहे जो प्रत्येक ठिकाणी उपस्थित राहण्याचा प्रयत्न करतो. पण तरीही तनिष्कने मला त्या क्षणी बाहेर जायला सांगितलं.”

मोहित सूरी म्हणाले, “तनिष्क बागची हे एक अत्युत्कृष्ट संगीतकार आहेत. त्यांना हे सर्व उत्तम प्रकारे हाताळता येतं हे मला ठाऊक आहे. आणि एक गोष्ट मी नक्की सांगू शकतो — संगीतामध्ये ‘विचार’ हाच खरी प्रतिभा असतो.” यशराज फिल्म्स निर्मित ‘सैय्यारा’ हा चित्रपट १८ जुलै २०२५ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Exit mobile version