प्रियांका गांधी म्हणतात, ‘खरे भारतीय कोण? हे न्यायालय ठरवू शकत नाही’

लष्कराविरुद्धच्या टिप्पणीवर राहुल गांधीना कोर्टाकडून फटकार

प्रियांका गांधी म्हणतात, ‘खरे भारतीय कोण? हे न्यायालय ठरवू शकत नाही’

सोमवारी (४ ऑगस्ट) सर्वोच्च न्यायालयाने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर मोठी टिप्पणी केली होती. राहुल गांधी यांनी लष्कराविरुद्ध केलेल्या कथित टिप्पणीप्रकरणी न्यायालयाने त्यांना फटकारले आणि म्हटले की, तुम्हाला कसे कळले की चीनने २००० चौरस किलोमीटर भारतीय जमीन बळकावली आहे? जर तुम्ही खरे भारतीय असता तर तुम्ही असे म्हटले नसते. दरम्यान, आता प्रियंका गांधी यांनी न्यायालयाच्या या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे.

काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी म्हणाल्या, ‘माननीय न्यायाधीशांबद्दल पूर्ण आदर बाळगून, मी हे सांगू इच्छिते कि खरे भारतीय कोण आहे?, हे ते ठरवू शकत नाहीत. सरकारला प्रश्न विचारणे हे विरोधी पक्षनेत्याचे कर्तव्य आहे. माझा भाऊ कधीही सैन्याविरुद्ध बोलणार नाही, त्यांना त्यांच्याबद्दल खूप आदर आहे. याचा चुकीचा अर्थ लावण्यात आला आहे.

दरम्यान, २००० किमी जमीन चीनने व्यापल्याचे तुम्हाला कसे कळले?”, असा सवाल न्यायालयाने काल केला होता. न्यायमूर्ती दीपांकर दत्ता व ऑगस्टिन जॉर्ज मसीह यांच्या खंडपीठाने विचारले, “तुम्ही विरोधी पक्षनेते आहात, मग अशा गोष्टी का बोलता? तुम्ही संसदेत प्रश्न का विचारत नाही?”. न्यायालय म्हणाले की,  जो खरा भारतीय आहे तो असे विधान करणार नाही.

हे ही वाचा : 

अमित शहा यांनी लालकृष्ण अडवाणी यांना टाकले मागे!

पंतप्रधान मोदींनी केले फिलिपीन्सचे राष्ट्रपती आर. मार्कोस यांचे स्वागत

आम्ही विकसित भारताच्या निर्मितीच्या दिशेने

यूपीआय आधारित व्यवहार पहिल्यांदाच ७० कोटींच्या पुढे

राहुल गांधींनी यापूर्वी अलाहाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती, परंतु ती फेटाळण्यात आली होती. त्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करताना दावा केला की, “हे प्रकरण राजकीय हेतूने प्रेरित आहे आणि त्यांना त्रास देण्याच्या उद्देशाने दाखल करण्यात आले आहे.” कोर्टाने राहुल गांधींविरोधातील फौजदारी कारवाईला तात्पुरती स्थगिती दिली आहे, परंतु त्यांच्या विधानावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

Exit mobile version