कोण आहेत रेखा गुप्ता ?

कोण आहेत रेखा गुप्ता ?

New Delhi, Feb 19(ANI): BJP MLA-elect Rekha Gupta arrives at the party office to attend BJP legislative party meeting, in New Delhi on Wednesday. (ANI Photo/Shrikant Singh)

भारतीय जनता पक्षाने पहिल्यांदाच आमदार झालेल्या रेखा गुप्ता यांची मुख्यमंत्रीपदी निवड केली आहे. ७० सदस्यांच्या सभागृहात ४८ जागा मिळवून २७ वर्षांनंतर राष्ट्रीय राजधानी दिल्लीत भाजप पुन्हा सत्तेत आल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. गुप्ता यांच्या नावाची घोषणा भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत करण्यात आली. यावेळी निरीक्षक रविशंकर प्रसाद आणि ओम प्रकाश धनखर उपस्थित होते.

रेखा गुप्ता या दिल्ली युनिव्हर्सिटी स्टुडंट्स युनियनच्या माजी अध्यक्ष आहेत. याशिवाय त्यांनी भाजप महिला मोर्चाचे सरचिटणीस आणि पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारी समितीचे सदस्य म्हणून काम केले आहे. त्यांनी १९९२ मध्ये दिल्ली विद्यापीठाच्या दौलत राम कॉलेजमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषद सोबत आपला राजकीय प्रवास सुरू केला. १९९६-९७ मध्ये त्या दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघच्या अध्यक्ष बनल्या. यावेळी त्यांनी विद्यार्थी-संबंधित समस्या सक्रियपणे मांडल्या.

हेही वाचा..

अमेरिकेतून निधी देऊन भारतातील निवडणूक निकालावर प्रभाव टाकण्याचा होता प्रयत्न

महाकुंभ : पाकिस्तानकडून बनावट व्हिडिओ शेअर केल्याबद्दल एफआयआर दाखल

कर्नाटकमध्ये काश्मिरी विद्यार्थ्याचे रॅगिंग

रेखा गुप्ता यांच्यासोबत आणखी सहा नेते घेणार मंत्री पदाची घेणार शपथ

२००७ मध्ये उत्तर पीतमपुरा येथून नगरसेवक म्हणून रेखा गुप्ता निवडून आल्या. तेव्हा त्यांनी ग्रंथालय, उद्याने आणि जलतरण तलाव यांसारख्या सार्वजनिक सुविधा वाढविण्यावर विशेष काम केले. २०१२ मध्ये त्या पुन्हा निवडून आल्या. त्यानंतर त्यांनी दक्षिण दिल्ली महानगरपालिकेच्या महापौर म्हणून काम केले.

रेखा गुप्ता यांनी आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिला विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी मदत करण्यासाठी “सुमेधा योजना” देखील सुरू केली. महिला कल्याण आणि बालविकास समितीच्या प्रमुख या नात्याने त्यांनी महिला सक्षमीकरणासाठी उपक्रमांवर काम केले. २०२५ च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत रेखा गुप्ता यांनी शालीमार बाग (उत्तर-पश्चिम) मतदारसंघातून ६८,२०० मतांनी विजय मिळवला.

Exit mobile version