तृणमूलचे ‘कट्टर’ समर्थक म्हटल्यावर मतदार पत्रकारावर भडकले!

पश्चिम बंगालमधील निवडणुकीच्या निमित्ताने जाणून घेत होता प्रतिक्रिया

तृणमूलचे ‘कट्टर’ समर्थक म्हटल्यावर मतदार पत्रकारावर भडकले!

पश्चिम बंगालमधील निवडणुकीचा दुसरा टप्पा २९ एप्रिल रोजी होत आहे. पहिल्या टप्प्यात २३ एप्रिलला भरघोस मतदान झाले. या दुसऱ्या टप्प्यासाठी आता मतदार किती प्रमाणात मतदान केंद्रापर्यंत जातात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

यानिमित्ताने विविध वाहिन्यांचे, यूट्युब चॅनेलचे पत्रकार पश्चिम बंगालमधील मतदारांच्या प्रतिक्रिया घेत आहेत. त्यांच्याकडून भाजपा, ममता बॅनर्जी की काँग्रेस यापैकी कुणाला लोक अधिक पसंत करत आहेत, हे जाणून घेण्याचा, त्यामागील कारणांचा मागोवा घेतला जात आहे. कुणी ममता बॅनर्जी जिंकतील असे म्हणत आहेत तर कुणाला भाजपाच इथे सत्तेत येईल असे वाटते आहे. काँग्रेसबद्दल लोक आपली प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. अशातच लल्लनटॉप या यूट्युब चॅनलचा एक पत्रकार पश्चिम बंगालमध्ये पोहोचला होता. तिथे एका मोहल्ल्यात तो काही मुस्लिम नागरिकांशी संवाद साधत होता. त्यावेळी त्याने प्रश्न विचारला की, ममतांच्या तृणमूल काँग्रेसची काय स्थिती वाटते तुम्हाला? मुस्लिमांचे मते कोणत्या पक्षाला जाणार आहेत. तेव्हा तिथे उपस्थित असलेले सगळेच बोलतात की, मतदान तर १०० टक्के तृणमूल काँग्रेसलाच जाणार.

या नागरिकांपैकी एकजण म्हणाला की, तृणमूल काँग्रेसला यावेळी २४० जागा मिळतील. तेव्हा पत्रकार म्हणाला एवढेही होण्याची शक्यता नाही कारण आम्हीही सगळी माहिती घेत फिरत आहोत, पश्चिम बंगालच्या विविध भागात. तेव्हा तो माणूस म्हणाला की, बघा ४ तारखेला काय निकाल येतो ते.

तेव्हा सदर पत्रकाराने म्हटले की, समजा इथे तृणमूलचे सरकार आले नाही, भाजपाचे आले. तुम्ही कदाचित मान्य करणार नाही, कारण तुम्ही तृणमूलचे कट्टर समर्थक आहात. त्यावर कुणीतरी त्या पत्रकाराला रोखले. आणि त्याच्याशी वाद घालायला सुरुवात केली.

वाद घालणारा व्यक्ती म्हणाला की, तुम्ही कट्टर शब्द कसा काय वापरला. तेव्हा पत्रकार म्हणाला की, तुम्ही तृणमूलचे कट्टर समर्थक नाहीत का? पण तो माणूस ऐकायला तयार नव्हता. सातत्याने तो बोलतच होता. तेव्हा माझेही म्हणणे ऐका अशी विनंती पत्रकाराने केली. त्या पत्रकाराने पुन्हा लोकांशी बोलायला सुरुवात केली आणि म्हटले की, मी एवढेच म्हटले की, तुम्ही तृणमूलचे कट्टर समर्थक आहात. तर पुन्हा एकदा लोक त्याला अडवू लागले.

कट्टर समर्थक बोलल्यानंतर मुस्लिम मोहल्ल्यात पत्रकाराला विरोध सहन करावा लागला.  कट्टर शब्दात नेमके एवढे काय आक्षेपार्ह होते, असा सवाल यामुळे सोशल मीडियावर विचारला जात आहे.

Exit mobile version