‘जर भारताने हल्ला केला तर मी इंग्लंडला पळून जाईन’

पाक खासदार शेर अफजल खान मारवत यांचे विधान

‘जर भारताने हल्ला केला तर मी इंग्लंडला पळून जाईन’

पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव शिगेला पोहोचला आहे. भारताने या हल्ल्याचा बदला घेण्याची प्रतिज्ञा केली आहे आणि पाकिस्तानविरुद्ध अनेक राजनैतिक पावले उचलली आहेत. भारताच्या हल्ल्याची भीती पाकिस्तानच्या कानाकोपऱ्यात दिसून येत आहे आणि तेथील नेते पाकिस्तानवरील हल्ल्यानंतर देश सोडण्याबद्दल बोलत आहेत.

पाकिस्तानच्या राष्ट्रीय सभेचे सदस्य शेर अफजल खान मारवत हे एका पत्रकाराच्या प्रश्नाचे उत्तर देत होते, ज्याने त्यांना विचारले होते की भारतासोबत युद्ध झाल्यास ते बंदूक घेऊन सीमेवर जातील का. यावर मारवत म्हणाले, “जर भारताशी युद्ध झाले तर मी इंग्लंडला जाईन.” त्यांचे हे विधान मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून यातून पाकिस्तानी नेत्यांमध्ये भारताच्या हल्ल्याची भीती स्पष्टपणे दिसून येत आहे.

यानंतर त्यांना आणखी एक प्रश्न विचारण्यात आला होता, ज्यावर त्यांनी मजेशीर उत्तर दिले. एका पत्रकाराने त्यांना विचारले तणाव कमी करण्यासाठी भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माघार घ्यावी असे तुम्हाला वाटते का?, यावर ते म्हणाले, “मोदी माझ्या मावशीचा मुलगा आहे का, कि ते माझ्या सांगण्यावरून माघार घेतील?.

हे ही वाचा : 

देशभरात NEET UG परीक्षेसाठी प्रशासन सतर्क

राजस्थानमध्ये सीमा सुरक्षा दलाने पाकिस्तानी रेंजरला घेतले ताब्यात!

मनोज तिवारींचा राहुल गांधींवर निशाणा

हाउस अरेस्ट शो प्रकरण : उल्लू अ‍ॅपने बजरंग दलची माफी मागितली

दरम्यान, सोशल मीडियावर त्यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी म्हटले की पाकिस्तानी राजकारण्यांनाही त्यांच्या लष्करावर विश्वास नाही. दरम्यान, शेर अफजल खान मारवत हे पूर्वी तुरुंगात असलेले माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पाकिस्तान तहरीक-ए-इंसाफचे (पीटीआय) सदस्य होते. तथापि, पक्ष आणि त्यांच्या नेतृत्वावर वारंवार टीका झाल्यामुळे इम्रान खान यांनी त्यांना प्रमुख पदांवरून काढून टाकले होते.

Exit mobile version