‘भारत-पाकिस्तान युद्धामुळे विनाश होऊ शकला असता’

 युद्धबंदीनंतर ट्रम्प

‘भारत-पाकिस्तान युद्धामुळे विनाश होऊ शकला असता’

भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीनंतर आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक मोठे विधान केले आहे. काश्मीरचा उल्लेख करताना त्यांनी येथे समस्या सोडवण्याबद्दल बोलले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून भारत आणि पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या वादानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरवातीला युद्धबंदीची माहिती दिली. यानंतर त्यांचे आणखी एक विधान समोर आले आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवर लिहिले की, या युद्धामुळे विनाश होऊ शकला असता आणि लाखो चांगल्या आणि निष्पाप लोकांचा बळी जाऊ शकला असता. ते पुढे म्हणाले, “भारत आणि पाकिस्तानच्या मजबूत आणि दृढ नेतृत्वाचा मला खूप अभिमान आहे. त्यांना वेळीच समजले की लाखो निष्पाप जीव वाचवणाऱ्या या संघर्षाला थांबवणे आवश्यक आहे. हा निर्णय केवळ धाडसी नाही तर या दोन्ही देशांच्या वारशाला अधिक गौरवशाली बनवतो.”

काश्मीरबाबत ते म्हणाले, “हजारो वर्षांनंतर” काश्मीरबाबत तोडगा निघू शकतो का हे पाहण्यासाठी मी तुम्हा दोघांसोबत काम करेन. भारत आणि पाकिस्तानच्या नेतृत्वाला चांगल्या कामासाठी देव आशीर्वाद देवो. तथापि, ट्रम्प हे विसरले की काश्मीरबाबत भारताचे स्पष्ट धोरण असे आहे की हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे.

हे ही वाचा : 

शस्त्रसंधी झाली; पण पाकला त्याआधी भारताने दिला मोठा दणका

पाकिस्तानचे शेपूट वाकडेच! शस्त्रसंधी तीन तासात मोडली, भारतीय लष्कराला अधिकार

“भारत धर्मनिरपेक्ष राष्ट्र असून मशिदींचे नुकसान केल्याचा पाकचा दावा खोटा!”

पाकिस्तानने शेपूट घातलं!

डोनाल्ड ट्रम्प यांनी असेही जाहीर केले की, अमेरिका आता भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांसोबत व्यापारी संबंध वाढवणार आहे. “यावर कोणतीही औपचारिक चर्चा झालेली नसली तरी, मी हे स्पष्ट करतो की अमेरिका दोन्ही देशांसोबत व्यापार वाढवणार आहे,” असे ट्रम्प म्हणाले.

Exit mobile version