योगी सरकारचा उच्च शिक्षण क्षेत्रात मोठा निर्णय

तीन विद्यापीठांमध्ये ९४८ नवीन पदांना मंजुरी

योगी सरकारचा उच्च शिक्षण क्षेत्रात मोठा निर्णय

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने उच्च शिक्षण क्षेत्रात आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. राज्यातील तीन नव्याने स्थापन झालेल्या विद्यापीठांमध्ये — गुरु जंभेश्वर विद्यापीठ (मुरादाबाद), माँ विंध्यवासिनी विद्यापीठ (मिर्झापूर) आणि माँ पाटेश्वरी विद्यापीठ (बलरामपूर) — एकूण ९४८ नवीन पदांच्या निर्मितीला मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये ४६८ तात्पुरती शैक्षणिकेतर पदे आणि ४८० आउटसोर्सिंग पदांचा समावेश आहे.

सरकारचा विश्वास आहे की या पदांच्या निर्मितीमुळे विद्यापीठांची प्रशासकीय व कार्यात्मक यंत्रणा अधिक बळकट होईल. त्याचबरोबर शैक्षणिक गुणवत्ता वाढेल आणि राज्यातील तरुणांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील. उच्च शिक्षण मंत्री योगेंद्र उपाध्याय म्हणाले की, “मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली उत्तर प्रदेश उच्च शिक्षण क्षेत्रात नवे विक्रम प्रस्थापित करत आहे. विद्यापीठांना मजबूत बनविण्यासोबतच राज्याला शिक्षण क्षेत्रात आघाडीवर नेण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे.”

हेही वाचा..

भूस्खलनानं संपूर्ण गाव उद्ध्वस्त, १००० लोकांचा मृत्यू, केवळ एक जीवित!

महिलाच आहेत विकसित भारताचा आधार

बलात्काराच्या आरोपातील ‘आप’ आमदार पोलिसांवर गोळीबार करून कोठडीतून फरार!

माझ्या आईचा अपमान अत्यंत वेदानादायी !

लक्षात घेण्यासारखे म्हणजे, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ वारंवार स्पष्ट करतात की राज्यातील तरुणांना गुणवत्तापूर्ण शिक्षण व रोजगार देणे हीच सरकारची सर्वोच्च प्राधान्यता आहे. विद्यापीठांमध्ये नवीन पदांची निर्मिती हा त्या दिशेने एक ठोस प्रयत्न असून, यामुळे उच्च शिक्षण अधिक सक्षम होईल आणि युवकांना आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करता येईल. प्रत्येक विद्यापीठात १५६ तात्पुरती शैक्षणिकेतर पदे निर्माण करण्यात आली आहेत. ही पदे २८ फेब्रुवारी २०२६ पर्यंत प्रभावी राहतील आणि आवश्यकतेनुसार रद्दही केली जाऊ शकतात.

या पदांमध्ये फार्मासिस्ट, इलेक्ट्रिशियन, अवर अभियंता, आशुलिपिक, सहाय्यक लेखापाल, कनिष्ठ सहाय्यक, लॅब तंत्रज्ञ, लॅब असिस्टंट, उप कुलसचिव, सहाय्यक कुलसचिव, वैयक्तिक सहाय्यक, लेखापाल, प्रधान सहाय्यक, वैद्यकीय अधिकारी आणि स्टाफ नर्स यांचा समावेश आहे. या पदांची भरती अधीनस्थ सेवा निवड आयोग, थेट भरती, पदोन्नती व प्रतिनियुक्तीच्या माध्यमातून केली जाईल. याशिवाय, प्रत्येक विद्यापीठात १६० पदे वाह्य सेवा पुरवठादार (आउटसोर्सिंग) यंत्रणेतून भरण्यात येतील, म्हणजेच एकूण ४८० पदे. यात संगणक ऑपरेटर, स्वच्छतादूत, चौकीदार, माळी, चपराशी, वाहन चालक व वाचनालय परिचर यांचा समावेश आहे. आउटसोर्सिंगची प्रक्रिया जेम पोर्टलच्या माध्यमातून पारदर्शक पद्धतीने पूर्ण केली जाईल. तसेच सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग विभाग, श्रम विभाग आणि कार्मिक विभाग यांच्या शासनादेशांचे पालन केले जाईल. सर्व नियुक्त्यांमध्ये आरक्षणाशी संबंधित नियम व प्रक्रियांचे पालन अनिवार्य असेल.

Exit mobile version