26 C
Mumbai
Monday, December 15, 2025
घरविशेष'सर्व मांसाहार स्टॉल्स तात्काळ बंद करा', भाजप आमदार महंत बालमुकुंद यांचे अधिकाऱ्यांना...

‘सर्व मांसाहार स्टॉल्स तात्काळ बंद करा’, भाजप आमदार महंत बालमुकुंद यांचे अधिकाऱ्यांना आदेश!

राजस्थानमधील हवामहलचे भाजप आमदार बालमुकुंद आचार्य निवडून आल्यावर ॲक्शन मोडमध्ये

Google News Follow

Related

राजस्थान विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठा विजय मिळाला असून आता सरकार स्थापनेची तयारी सुरू आहे. अशा स्थितीत निवडणुकीचा निकाल लागून २४ तासही उलटले नसून नवनिर्वाचित आमदार ॲक्शन मोडमध्ये दिसत आहेत.भाजपच्या आमदाराने एका अधिकाऱ्याला फोन करून संध्याकाळपर्यंत सर्व मांसाहारी पदार्थांचे स्टॉल रस्त्यावरून हटवण्याचा इशारा दिला आहे.

हवामहलचे भाजप आमदार बालमुकुंद आचार्य यांनी एका सरकारी अधिकाऱ्याला फोन करून रस्त्यावर मांसाहार विक्री करणाऱ्या स्टॉल्सवर तात्काळ बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत.मांसाहाराची विक्री करणाऱ्या अशा सर्व गाड्या हटवून सायंकाळपर्यंत सर्व रस्ते मोकळे करावेत, असे आदेश आमदार बालमुकुंद आचार्य यांनी सरकारी अधिकाऱ्याला दिले आहेत.

हे ही वाचा:

झोमॅटोवरून ऑर्डर केलेल्या बिर्याणीत सापडला मृत सरडा!

महाबिझ २०२४ समिटचे दुबई येथे आयोजन!

माऊंट मेरापी ज्वालामुखीचा उद्रेक; ११ गिर्यारोहकांचा मृत्यू, १२ बेपत्ता!

डीपफेकमुळे पोर्न मार्केटमध्ये वाढ, केवळ ४० रुपयांमध्ये बनवले जातात बनावट व्हिडिओ!

 

भाजप आमदार बालमुकुंद आचार्य यांनी सरकारी अधिकाऱ्याला फोन करत म्हंटले की, आपण रस्त्यावर उघडपणे मांसाहारची विक्री करू शकतो का?, होय किंवा नाही याचे तुम्ही उत्तर द्या? तुमचे याला समर्थन आहे का? तुम्ही तात्काळ कारवाई करत रस्त्यावरील सर्व मांसाहार स्टॉल्स तात्काळ बंद करा.संध्याकाळपर्यंत याची माहिती मला मिळाली पाहिजे, असे आमदार बालमुकुंद आचार्य म्हटले.

दरम्यान, रविवारी जाहीर झालेल्या निवडणूक निकालांमध्ये बालमुकुंद आचार्य यांनी राजधानी जयपूरच्या हवामहल विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर ६०० मतांनी विजय मिळवला आहे. बालमुकुंद आचार्य यांनी काँग्रेसचे आरआर तिवारी यांचा पराभव केला आहे.बालमुकुंद आचार्य यांचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यांनतर एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी यावर टीका केली.ते म्हणाले की, हे चुकीचे आहे.एखाद्याला मांसाहारचा स्टॉल लावायचा असेल तर त्याला कोणी रोखणार कसे?, तसेच एखाद्या व्यक्तीला मांसाहार खायचे असेल तर तुम्ही त्याला रोखू शकत नाही.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा