27 C
Mumbai
Friday, September 18, 2026
घरक्राईमनामाकेंद्रात काँग्रेसची सत्ता येऊ दे मग मोदींना मारू; पंतप्रधानांना जीवे मारण्याची धमकी

केंद्रात काँग्रेसची सत्ता येऊ दे मग मोदींना मारू; पंतप्रधानांना जीवे मारण्याची धमकी

कर्नाटकमधील व्यक्तीचा व्हिडीओ व्हायरल; पोलिसांकडून तपास सुरू

Google News Follow

Related

- Advertisement -National Stock Exchange

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी एका तरुणाने दिली असून यामुळे खळबळ उडाली आहे. कर्नाटकमधील मोहम्मद रसूल कद्दारे नावाच्या एका व्यक्तीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जीवे मारण्याची धमकी दिली आहे. त्याने समाजमाध्यमांवर हातात तलवार घेऊन एक व्हिडीओ शेअर केला आहे. केंद्रात काँग्रेसची सत्ता आल्यास मोदींना जीवे मारणार अशी धमकी त्याने या व्हिडीओच्या माध्यमातून दिली आहे. या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

देशात सध्या निवडणूकीपूर्वीचे वारे वाहत असून आगामी लोकसभा निवडणुकीची घोषणा कोणत्याही क्षणी होण्याची शक्यता आहे. एकीकडे विरोधकांचा जागावाटपाचा तिढा सुटत नसताना भाजपाने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. अशातच कर्नाटकमधील मोहम्मद नावाच्या या व्यक्तीने केंद्रात काँग्रेसचे सरकार आल्यास मी मोदींना जीवे मारणार, अशी धमकी दिली आहे. या थेट धमकीच्या व्हिडीओमुळे सध्या एकच खळबळ उडाली आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी मोहम्मद हा फरार आहे. पोलीस सध्या त्याचा शोध घेत आहेत.

हे ही वाचा:

स्वतःच्या जुळ्या मुलांना पाहण्याआधी पंतप्रधान मोदी यांच्या स्वागतासाठी धाव

डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक लढवू शकणार

विभागीय शालेय किकबॉक्सिंग स्पर्धेत आलोक, दुर्वाला सुवर्ण

भाजपाने चंदीगड उपमहापौरपदाची निवडणूक जिंकली

पोलीस या व्यक्तीचा शोध घेत असून पोलिसांनी त्याच्याविरोधात भारतीय दंडविधानाच्या कलम ५०५ (१) (ब), २५ (१) (ब) तसेच शस्त्रास्त्र कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
333,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा