28.2 C
Mumbai
Monday, October 19, 2026
घरविशेषजम्मूहून श्रीनगरला जाणारी टॅक्सी दरीत कोसळून १० जणांचा मृत्यू

जम्मूहून श्रीनगरला जाणारी टॅक्सी दरीत कोसळून १० जणांचा मृत्यू

जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर अपघात

Google News Follow

जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या गाडीचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या एका प्रवासी टॅक्सीला जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर अपघात झाला. या घटनेत १० जणांचा मृत्यू झाला आहे. रामबनजवळ ही घटना घडली आहे.

जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवार, २९ मार्च रोजी टॅक्सी दरीत कोसळून किमान १० जणांचा मृत्यू झाला आहे. रामबनजवळ हा अपघात झाला. एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस, राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ) आणि रामबनचे नागरी जलद प्रतिसाद दल (क्यूआरटी) घटनास्थळी पोहोचले आहे. अपघातस्थळी बचाव कार्य सुरु आहे. मात्र, पावसामुळे बचावकार्यात व्यत्यय येत असल्याची माहिती आहे. या भीषण अपघाताचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. पोलीस या घटनेची अधिक माहिती घेत आहेत.

हे ही वाचा:

डीपफेक हे मोठं आव्हान; एआय जनरेटेड गोष्टींवर वॉटरमार्क हवा

२०५० पर्यंत सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून भारत उदयास येणार

वकिलांच्या पत्रानंतर पंतप्रधान मोदी यांची काँग्रेस नेत्यांवर टीका

बेंगळुरूतील कॅफे स्फोटातील मुख्य संशयिताला अटक

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवाशांनी भरलेली एक टॅक्सी श्रीनगरहून जम्मू येथे निघाली होती. मध्यरात्री १.१५ च्या सुमारास या टॅक्सीचा अपघात झाला. टॅक्सी ३०० फूट खोल दरीत कोसळली. सध्या घटनास्थळी बचावकार्य सुरु आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
339,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा