30 C
Mumbai
Saturday, December 27, 2025
घरविशेषमुंबईतील जया शेट्टी हत्याकांड प्रकरणी छोटा राजनला जन्मठेपेची शिक्षा!

मुंबईतील जया शेट्टी हत्याकांड प्रकरणी छोटा राजनला जन्मठेपेची शिक्षा!

तब्बल २३ वर्षांनी लागला निकाल

Google News Follow

Related

मुंबईतील हॉटेल व्यावसायिक जया शेट्टी हत्याकांड प्रकरणी अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन याला मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.मोक्का(महाराष्ट्र संघटीत अपराध नियंत्रण अधिनियम) अंतर्गत न्या. ए.एम.पाटील यांनी जन्मठेपेची शिक्षा आणि १६ लाखांचा दंड सुनावलं आहे.या हत्याकांडाचा तब्बल २३ वर्षानंतर निकाल लागला असून यामध्ये छोटा राजन दोषी ठरलेला आहे.

यासंदर्भात माहिती देताना विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी सांगितले की, जया शेट्टी हे एक हॉटेल व्यावसायिक होते.त्यांची मुंबईत अनेक हॉटेल्स होते.छोटा राजनच्या गँगकडून नेहमी त्यांच्याकडे खंडणीची मागणी येत होती.परंतु, शेट्टी यांनी खंडणी देण्यास नकार दिला.छोटा राजनकडून रवी पुजारी हे काम करत होता.शेट्टी यांनी खंडणीसाठी नकार दिल्याने त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना गँगकडून ठार मारण्याच्या धमक्या येण्यास सुरुवात झाल्या.

हे ही वाचा:

केवढा हा आत्मविश्वास… नरेंद्र मोदींच्या शपथविधीचे ठिकाण, तारीखही ठरली!

पुणे प्रकरणातील अल्पवयीन आरोपीऐवजी आईचे घेतले रक्तनमुने!

हवामान विभागाच्या अंदाजापेक्षा एक दिवस आधीच मान्सूनचे केरळमध्ये आगमन

सलमान खान गोळीबार प्रकरणी आणखी तीन आरोपींच्या मुसक्या आवळल्या

या प्रकरणी शेट्टी यांनी पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.पोलिसांनी तपासणी करून शेट्टींसह त्यांच्या कुटुंबियांना २००० सालापर्यंत पोलीस प्रोटेक्शन देण्यात आलं होत.परंतु, पोलिसांनी प्रोटेक्शन काढताच शेट्टी यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली. ग्रांटरोडला असलेल्या हॉटेल गोल्डन क्राऊन्ट या ठिकाणी छोटा राजनच्या दोन साथीदारांनी शेट्टी यांची गोळ्या झाडून हत्या केली.

दरम्यान, शेट्टी यांची हत्याकरून पळणाऱ्या दोन्ही आरोपीना जमावाने आणि ट्राफिक पोलिसांनी पकडले.या प्रकरणातील अन्य आरोपी अजय मोहिते, प्रमोद धोंडे आणि राहुल पावसरे यांना साल २०१३ मध्येच कोर्टानं दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली आहे.आता या प्रकरणात छोटा राजन दोषी ठरला आणि त्याला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली.दरम्यान, छोटा राजन सध्या दिल्लीतील तिहार कारागृहात आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
285,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा