33 C
Mumbai
Saturday, December 20, 2025
घरविशेषराष्ट्रीय लॉकडाऊन अटळ?

राष्ट्रीय लॉकडाऊन अटळ?

Google News Follow

Related

कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे भारतात पुन्हा एकदा देशव्यापी लॉकडाऊन होण्याचे संकेत मिळत आहेत. यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन करणार नाही, असे सांगितले होते. मात्र, अनेक तज्ज्ञ, टास्क फोर्स आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनंतर पंतप्रधान मोदी आपल्या निर्णयाचा फेरविचार करु शकतात, असे सूत्रांकडून सांगितले जात आहे.

देशात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने लॉकडाऊनसाठी पंतप्रधान मोदींवरील दबाव वाढला आहे. सर्वोच्च न्यायालयानेही गरज पडल्यास लॉकडाऊन करावा, अशी सूचना केली आहे. मात्र, त्यापूर्वी दुर्बल घटकांची योग्यप्रकारे सोय करावी, असेही न्यायालयाने सांगितले आहे. त्यामुळे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी काय निर्णय घेतात, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

भारतात गेल्या २४ तासात ३ लाख ६८ हजार १४७ नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे कालच्या तुलनेत आज कोरोनाबाधितांच्या संख्येत घट झाली आहे. तर काल दिवसभरात तब्बल ३ लाख ९२ हजार ४८८ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ही १ कोटी ९९ लाख २५ हजार ६०४ पर्यंत पोहोचली आहेत. तर दुसरीकडे ३४१७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोना मृतांचा आकडा हा २ लाख १८ हजार ९५९ इतका झाला आहे.

हे ही वाचा:

देशात कोरोना रुग्णसंख्येत घट

पोलीस महासंचालक संजय पांडेंचा परमबीर सिंगांची चौकशी करण्यास नकार

अजून २-३ महिने लसींचा तुटवडा

गोव्यात लॉकडाऊन नाही, मात्र आठ दिवस निर्बंध कायम

तर दुसऱ्या बाजूला भारतातील कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येत कमालीची वाढ होत आहे. काल दिवसभरात ३,००,७३२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे कोरोनामुक्त होणाऱ्यांची एकूण संख्या ही १ कोटी ६२ लाख ९३ हजार ००३ इतकी झाली आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा