27.9 C
Mumbai
Sunday, October 18, 2026
घरविशेषपंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी!

पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी!

अंबोली पोलिसांकडून महिलेला अटक

Google News Follow

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याच्या धमकीचा फोन आला आहे. मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला हा धमकीचा फोन आला. या प्रकरणी अंबोली पोलिसांनी एका महिलेला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला बुधवारी (२७ नोव्हेंबर) रात्री ९ च्या सुमारास धमकीचा फोन आला. धमकी देणाऱ्या व्यक्तीने पंतप्रधान नरेंद्र मोदींना मारण्याचा कट सुरू असून वेपनची तयारी झाल्याची माहिती पोलिसांना दिली. यानंतर पोलिसांचे पथक अलर्ट झाले आणि तपास सुरु केला.

या कॉल प्रकरणी शितल चव्हाण नावाच्या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अंबोली पोलिसांनी ही कारवाई केली. अटक करण्यात आलेल्या महिलेची चौकशी केली असता ती महिला कौटुंबिक वादातून मानसिक तणावात असल्याचे प्राथमिक पोलीस तपासात समोर आले. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींना धमकीचा फोन आल्यामुळे एकच खळबळ उडाली होती.

हे ही वाचा : 

मणिपूरमधील संवेदनशील भागात व्यापक शोध मोहीम; ९४ चौक्या स्थापन

झारखंडमध्ये लिव्ह-इन पार्टनरची हत्या

एअर इंडियाच्या महिला वैमानिकाची आत्महत्या

दिल्लीत ईडीच्या पथकावर हल्ला, एक अधिकारी जखमी

 

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
338,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा