28.9 C
Mumbai
Wednesday, October 21, 2026
घरविशेष२०१९-२०२२ मध्ये संधी हुकली, पण यंदा जनतेने फडणवीसांना अविश्वसनीय बहुमत दिलं!

२०१९-२०२२ मध्ये संधी हुकली, पण यंदा जनतेने फडणवीसांना अविश्वसनीय बहुमत दिलं!

राज ठाकरेंकडून फडणविसांचे अभिनंदन

Google News Follow

राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले असून मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी पदाची शपथ घेतली. महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे. याच दरम्यान, मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी पोस्टकरत देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले आहे.

आज माझे स्नेही आणि भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रातील नेते देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, याबद्दल त्यांचं अभिनंदन. ते पुढे म्हणाले, २०१९ ला खरंतर ही संधी त्यांना मिळायला हवी होती, पण तेंव्हा आणि पुढे २०२२ मध्ये जे घडलं त्यामुळे ती संधी हुकली. असो, पण यावेळेस महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला म्हणण्यापेक्षा देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाला जे प्रचंड अविश्वसनीय बहुमत दिलं आहे, त्याचा या राज्यासाठी, इथल्या मराठी माणसांसाठी आणि मराठी भाषा आणि संस्कृतीसाठी तुम्ही योग्य वापर कराल अशी मी आशा करतो.

हे ही वाचा : 

शिंदेंनी पहिल्यांदा तर अजित पवारांनी सहाव्यांदा घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ!

फडणवीसांना गादीसाठी नाहीतर लोकांच्या सेवेसाठी पुन्हा यायचे होते!

“मी देवेंद्र गंगाधरराव फडणवीस, ईश्वरसाक्ष शपथ घेतो की…”

बिहार : इन्स्पेक्टर खानने तक्रार करण्यासाठी आलेल्या महिलेचा केला विनयभंग

पुढची ५ वर्ष सरकारच्या कुठल्याही चांगल्या उपक्रमांना माझा, माझ्या पक्षाचा पाठींबा असेल. पण सरकार चुकतंय, लोकांना गृहीत धरतंय असं जर जाणवलं, तर मात्र विधिमंडळात जरी सध्या शक्य नसलं तरी, विधिमंडळाच्या बाहेर मात्र आम्ही सरकारला त्यांच्या चुकांची जाणीव करून देऊ हे नक्की.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आणि उपमुख्यमंत्री  एकनाथ शिंदे आणि अजित पवार आणि तसंच भविष्यातील त्यांच्या मंत्रिमंडळातील सर्व सहकाऱ्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शुभेच्छा, असे राज ठाकरे म्हणाले.

 

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
339,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा