27 C
Mumbai
Sunday, December 14, 2025
घरविशेषमुंबई इंडियन्सच्या महिला हुशार; दुसऱ्यांदा बनल्या चॅम्पियन

मुंबई इंडियन्सच्या महिला हुशार; दुसऱ्यांदा बनल्या चॅम्पियन

दिल्ली कॅपिटल्सना सलग तिसऱ्यांदा रनर-अप बनण्याची नामुष्की

Google News Follow

Related

हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियंस दुसऱ्यांदा महिला प्रीमियर लीगची चॅम्पियन बनली आहे. दिल्ली कॅपिटल्सचा ८ धावांनी पराभव करत त्यांनी हा किताब मिळवला आहे. दिल्ली कॅपिटल्सना सलग तिसऱ्यांदा रनर-अप बनण्याची नामुष्कीही त्यांनी ओढवली आहे. शनिवारी, ब्रेबोर्न स्टेडियमवर झालेल्या फायनलमध्ये, हरमनप्रीतची झुंजार ६६ धावांची खेळी आणि नैट सिवर-ब्रंट हिच्या ऑलराउंड योगदानामुळे (३० धावा आणि ३० धावांवर ३ विकेट) मुंबई इंडियंसने दिल्ली कॅपिटल्सला आठ धावांनी पराभूत करून चॅम्पियन बनली.

दिल्ली हा सामना जिंकू शकेल, असे वाटत होते. परंतु दिल्लीच्या हाराकिरीमुळे फायनलचे ओझे त्यांना पेलवले नाही. त्यांनी ठराविक अंतराने आपल्या विकेट्स गमावल्या. सुरुवातीलाच दिल्लीच्या सलामीवीरांना तंबूत धाडण्यात मुंबई इंडियन्स यशस्वी झाल्यामुळे मुंबईने दिल्लीवर दबाव टाकला. ठराविक अंतराने मुंबईने दिल्लीच्या फलंदाजांने तग न धरताच तंबूत धाडले. दिल्लीनेही शेवटपर्यंत कडवट झुंज देत सामना कधी या बाजूला तर कधी त्या बाजूला करण्यात दिल्ली काही प्रमाणात यशस्वीही झालेली. परंतु अखेरच्या षटकापर्यंत गेलेला हा सामना शेवटी मुंबईने आपल्या खिशात टाकला आणि दुसऱ्यांदा चॅम्पियन्स मिळवण्याचा मान मिळवला.

हेही वाचा :

तेज प्रताप यादवची पोलिसाला धमकी, म्हणाला ‘नाच नाहीतर सस्पेंड होशील’

मजल्यावर मजले, तारीख पे तारीख, मुक्काम पोस्ट डोंगरी…

पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यापूर्वी वॉशिंग्टनमध्ये राबवली स्वच्छता मोहीम

मुंबई इंडियंसच्या कॅप्टन हरमनप्रीत कौरने एका बाजूला मुंबईची पडझड होत असताना “मैं हू ना” म्हणत पिचवर घट्ट पाय रोवत धुवांधार ६६ धावांची उत्कृष्ट पारी खेळली. तिला साथ मिळाली ती नैट सिवर-ब्रंटसह अर्धशतकाच्या भागीदारीची. अखेर मुंबई इंडियन्स सात विकेटवर १४९ धावापर्यंत मजल मारण्यात यशस्वी ठरली. त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाजीच्या जीवावर  दिल्लीला १४१ धावांवर रोखण्यात आले.

दिल्लीच्या रिजान काप हिने ४३ चेंडूंवर ४० धावा करत सामना अखेरपर्यंत रोमांचक ठेवला. परंतु दुसऱ्या बाजूने दिल्लीच्याही विकेट्स पडत राहिल्या. काप आऊट झाल्यानंतर निक्की प्रसादनेही आशेचा किरण दाखवण्याचा प्रयत्न केला. पण मुंबईने आपली सामन्यावरची पकड ढिली होऊ दिली नाही.

हरमनप्रीतने ४४ चेंडूंवर ६६ धावांत ९ चौके आणि २ गगनचुंबी षटकार मारले. तिला या धडाकेबाज, जिगऱ्या खेळीमुळे प्लेयर ऑफ द मॅच म्हणून निवडण्यात आले. नैट सिवर-ब्रंटने २८ चेंडूंमध्ये ४ चौके मारून ३० धावांचे महत्वाचे योगदान दिले. जी कमालिनीने १० धावा आणि अमनजोत कौरने नाबाद १४ धावा करून मुंबईला लढण्याजोगा स्कोर धावफलकार लावून दिला.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा