23 C
Mumbai
Monday, December 15, 2025
घरधर्म संस्कृती'पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांना गोळ्या घाला'

‘पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांना गोळ्या घाला’

हिंदू एकता आंदोलन विश्व हिंदू परिषदेची संताप्त निदर्शने.

Google News Follow

Related

इस्लामी दहशतवाद्यांना पाकिस्तानात घुसून गोळ्या घालून ठार मारा. मृत्युमुखी पडलेल्या हिंदू कुटुंबियांना प्रत्येकी ५० लाख रुपये तातडीची मदत द्या. हिंदू एकता आंदोलन विश्व हिंदू परिषदेची संताप्त निदर्शने. पाकचा राष्ट्रध्वज जाळला.
जम्मू कश्मीर येथील पेहलगाम येथे धर्म विचारून ज्या २७ हिंदूंची हत्या केली होती. त्याच्या निषेधार्थ आज हिंदू एकता आंदोलन व विश्व हिंदू परिषद यांच्यावतीने अप्पर तहसीलदार कार्यालय सांगली येथे श्रद्धांजली व निदर्शनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी प्रथम मृत्यूमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली व नंतर पाकिस्तानचा ध्वज जाळून जलादो जला दो पाकिस्तान जलादो, बटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ है, गर्व से कहो हम हिंदू है, जिसको चाहिए पाकिस्तान उसको भेजो कब्रस्तान च्या जोरदार घोषणा देण्यात आल्या.

पृथ्वीतलावरून दहशतवादी पाकिस्तान या देशाचे नाव पुसून टाका. इस्लामी दहशतवाद्याच्या हल्लात मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबियांना प्रत्येकी ५० लाखांची मदत तातडीने द्या, काश्मीर आणी पाकिस्तानात लपलेल्या इस्लामी दहशतवाद्यांना घुसून गोळ्या घालून ठार मारा. सरकारकडे या मागण्या करण्यात आल्या.

यावेळी बोलताना हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, केंद्र सरकारने पाकिस्तानचे पाणी बंद करण्याचे काम केलेलं आहे. आता अन्नपुरवठा बंद करा. एअर स्टाईल सर्जिकल स्ट्राइक प्रमाणे पाकिस्तानामध्ये घुसून लपलेल्या ठिकाणी इस्लामिक दहशतवाद्यांना गोळा घालून ठार मारा. पाकिस्तान आणि बांगलादेशा बरोबरचे क्रिकेटचे सामने हिंदूंनो होऊ देऊ नका उधळून लावा. हिंदूंनो सुरुवात इस्लामिक दहशतवादी नी केलेली आहे शेवट आपल्याला करायचा आहे.

हे ही वाचा:

कॉमेडियन कुणाल कामराला धक्का, गुन्हे रद्द करण्यास कोर्टाचा नकार!

प. बंगालच्या आसनसोलमध्ये ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा

पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी आसिफ शेखचे घर उडवले

मेणबत्या कसल्या पेटवता, तुमच्यातले गद्दार शोधा…

यावेळी बोलताना विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष ऍड. बाळासाहेब देशपांडे म्हणाले की, इस्लामिक दहशतवाद्यांनी हिंदू महिलांना टिकली काढायला लावून आजान म्हणायला लावून पॅन्ट उतरून सुन्ता केला आहे का नाही हे पाहून हिंदू आहे ही खात्री करून गोळा घालून हिंदूंची हत्या केली. मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबांना सरकारने दिलेली मदत तुटपुंजी आहे ती ५ लाख ऐवजी ५० लाख देण्यात यावी. २०४७ पर्यंत इस्लामी राष्ट्र बनवण्याची सुरुवात आता झालेली आहे आता हिंदूने सुद्धा शस्त्र सज्ज झालं पाहिजे.

यावेळी अविनाश मोहिते, संजय जाधव, श्रीराम कुलकर्णी, दत्ता भोकरे, मनोज साळुंखे आदींची भाषणे झाली.
या आंदोलनामध्ये अर्बन बँकेचे चेअरमन गणेश गाडगीळ, रा. स्व. व संघाचे कार्यवाह नितीनजी देशमाने, स्वातीताई शिंदे, पृथ्वीराज भैय्या पवार, अनिरुद्ध कुंभार, अवधूत जाधव, सोमनाथ गोटखिंडे, रवींद्र वादवणे, प्रसाद रिसवडे, प्रदीप निकम,श्रीकांत शिंदे, प्रकाश चव्हाण, अरविंद येतनाळे, सुनील तिवले, गजानन माने, प्रथमेश शेटे, सुरज मामा पवार, सुनिता इनामदार, गजानन मोरे, अभिमन्यू भोसले, विनायक खेडेकर, प्रकाश बिरजे, सचिन पवार, आदी हिंदुत्ववादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा