22 C
Mumbai
Tuesday, December 16, 2025
घरविशेषसनी देओल यांनी 'लकीर' चित्रपट स्क्रिप्ट न पाहताच साइन केला होता

सनी देओल यांनी ‘लकीर’ चित्रपट स्क्रिप्ट न पाहताच साइन केला होता

Google News Follow

Related

प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आणि कोरिओग्राफर अहमद खान यांनी अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांच्या २००४ मध्ये प्रदर्शित झालेल्या अ‍ॅक्शन-ड्रामा चित्रपट ‘लकीर – फॉरबिडन लाइन्स’ संदर्भात एक खास गोष्ट सांगितली. त्यांनी खुलासा केला की सनी देओल यांनी संपूर्ण स्क्रिप्ट न ऐकताच चित्रपटात काम करण्यास होकार दिला होता. चित्रपटाबद्दल बोलताना अहमद म्हणाले, “सनी आणि मी अनेक वर्षांपासून मित्र आहोत आणि त्यांचे सहकार्य माझ्यासाठी नेहमीच महत्त्वाचे राहिले आहे. जेव्हा मी माझा पहिला चित्रपट दिग्दर्शित करत होतो, तेव्हा मला सनी देओल यांच्या ऑफिसमधून फोन आला. मी त्या वेळी फुटबॉल खेळत होतो. फोन आल्यानंतर मी त्यांना भेटायला गेलो आणि त्यांनी विलंब न करता लगेच चित्रपटासाठी ‘हो’ सांगितले.”

ते पुढे म्हणाले, “मला स्क्रिप्ट पूर्णपणे सांगण्याचीही गरज पडली नाही. मी फक्त गोष्टीची झलक दिली आणि सनी यांना कल्पना इतकी आवडली की त्यांनी लगेच चित्रपट करण्यास होकार दिला. त्यांनी त्यांच्या टीमला शूटिंगच्या तारखा लवकर ठरवण्यास सांगितले. या चित्रपटात सनी देओलसोबत सुनील शेट्टी, जॉन अब्राहम, सोहेल खान आणि नौहीद सायरुसी मुख्य भूमिकेत होते. चित्रपटाचे संगीत ए.आर. रहमान यांनी दिले होते, जे भारतातील आघाडीचे संगीतकार आहेत. तर पार्श्वसंगीत आदेश श्रीवास्तव यांनी दिले होते.

हेही वाचा..

पुतिन यांची संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यांनी घेतली भेट

भारताची एअर डिफेन्स सिस्टीम अभेद्य

आपल्याकडे पीओके परत घेण्याची क्षमता

भारताच्या हल्ल्यानंतर डॉन दाऊद इब्राहिमची तंतरली, पाकिस्तानातून पळाला?

चित्रपटाची कथा करण आणि साहिल या दोन पात्रांभोवती फिरते. करण हा एका ताकदवान व्यक्तीचा भाऊ असतो, तर साहिल हा साधा, प्रामाणिक स्वभावाचा मुलगा असतो. दोघेही बिंदिया नावाच्या मुलीवर प्रेम करतात आणि तिथून कथेत नाट्यमय वळण येते. वर्कफ्रंटबाबत बोलायचं झालं, तर सनी देओल सध्या ‘बॉर्डर २’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. या चित्रपटात वरुण धवन, दिलजीत दोसांझ आणि अहान शेट्टीही मुख्य भूमिकेत असणार आहेत. अनुराग सिंग दिग्दर्शित आणि भूषण कुमार व निधी दत्ता निर्मित हा चित्रपट १९९७ च्या हिट चित्रपट ‘बॉर्डर’ चा सिक्वेल आहे. ‘बॉर्डर २’ हा चित्रपट २३ जानेवारी २०२६ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा