25 C
Mumbai
Wednesday, December 17, 2025
घरविशेषनोरा फतेही काय म्हणाल्या भारतीय लष्कराबद्दल?

नोरा फतेही काय म्हणाल्या भारतीय लष्कराबद्दल?

Google News Follow

Related

भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही यांनी भारतीय सशस्त्र दलांप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे. त्यांनी जवानांच्या शौर्य, बलिदान आणि देशरक्षणातील त्यागाला सलाम केला. अभिनेत्रीने म्हटले की, कठीण प्रसंगी हे जवान देशवासीयांसाठी आशेचा किरण बनतात. त्यांनी जवानांच्या सुरक्षिततेसाठी आणि शांततेसाठी प्रार्थना देखील केली.

नोरा फतेही यांनी आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे भारतीय सशस्त्र दलांचे आभार मानले. त्यांनी लिहिले, “प्रिय भारतीय लष्कर, या कठीण काळात मी तुमच्या अतूट धैर्य, बलिदान आणि समर्पणासाठी मनापासून धन्यवाद द्यायचं इच्छिते. भारताच्या सुरक्षिततेसाठी आणि सार्वभौमत्वासाठी तुमचे सातत्याने केले जाणारे प्रयत्न दुर्लक्षित करता येणार नाहीत.” त्या पुढे म्हणाल्या, ‘‘देश सध्या कठीण परिस्थितीतून जात आहे, अशा वेळी भारतीय जवानांचे धैर्य आणि समर्पण सामान्य लोकांसाठी प्रेरणा आणि सकारात्मक आशा देत आहे. गर्व आणि सन्मानाने भारताचे रक्षण केल्याबद्दल आणि खंबीरपणे उभे राहिल्याबद्दल तुमचे आभार. आम्ही भारत आणि सशस्त्र दलांच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करतो! आमचे खरे हिरो! जय हिंद!’’

हेही वाचा..

पाकिस्तानचे ५० पेक्षा जास्त ड्रोन, क्षेपणास्त्रे केली नष्ट

पाकिस्तानकडून खोट्या बातम्यांचा मारा; हवाई दलाच्या तळाचे बनावट फोटो

उन्हाळ्यात आंबा खाल्ल्याने मन प्रसन्न राहतं

बीएसएफची कारवाई; सियालकोटमधील लूनी येथील दहशतवादी लाँच पॅड उध्वस्त

दुसरीकडे, अभिनेत्री श‍िवालिका ओबेरॉय यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ संदर्भात इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती. त्या पोस्टमध्ये लिहिले होते, ‘‘जेव्हा एखाद्या महिलेच्या समोर तिच्या पतीला मारले जाते, तेव्हा संपूर्ण देश केवळ शोक व्यक्त करत नाही, तर जागृत होतो. आज या दोन महिला अधिकारी – विंग कमांडर व्योमिका सिंह आणि कर्नल सोफिया कुरैशी – केवळ सैन्य अधिकारी म्हणून नव्हे, तर त्या प्रत्येक महिलेचे प्रतीक ठरल्या आहेत, ज्यांनी आपल्या दुःखाला शक्तीमध्ये रूपांतरित केले, त्या प्रत्येक मातांचे प्रतीक ठरल्या आहेत, ज्यांनी आपल्या मुलांना राष्ट्रसेवेकरिता पाठवले. ऑपरेशन ‘सिंदूर’ हे केवळ सूड नाही, ती एक इशारा आहे: जेव्हा भारताच्या अंत:करणावर आघात होतो, तेव्हा दुर्गा उभी राहते. यावेळी ती दुर्गा आशीर्वाद देण्यासाठी नव्हे, तर प्रतिकारासाठी येत आहे.’’

सांगण्यात येते की, २२ एप्रिल रोजी जम्मूच्या पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे घेतला होता. या ऑपरेशनअंतर्गत पाकिस्तान आणि पीओकेमधील नऊ दहशतवादी तळांना लक्ष्य करण्यात आले होते. त्यानंतर पाकिस्तान भारतावर सातत्याने हल्ले करत आहे. मात्र भारतीय लष्कर त्याला तितक्याच ताकदीनं प्रत्युत्तर देत आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा