29.2 C
Mumbai
Tuesday, October 20, 2026
घरक्राईमनामाहिंदू मुलींना अडकवा, लग्न करा आणि वेश्या व्यवसायात ढकला! कॉंग्रेसचे लव्ह जिहादसाठी...

हिंदू मुलींना अडकवा, लग्न करा आणि वेश्या व्यवसायात ढकला! कॉंग्रेसचे लव्ह जिहादसाठी फंडिंग?

इंदौरमधील घटना, आरोपी अल्ताफ खान आणि साहिल शेखला अटक 

Google News Follow

मध्य प्रदेशातील इंदूर लव्ह जिहाद प्रकरणात काँग्रेस नगरसेवक अन्वर कादरी उर्फ ​​अन्वर डकोइत यांचे नाव समोर आले आहे. हिंदू मुलींना फसविण्यासाठी त्याने त्याचे दोन साथीदार साहिल शेख आणि अल्ताफ खान यांना लाखो रुपये दिल्याचा आरोप आहे. त्याने दोघांनाही पैसे देऊन हिंदू मुलींना फसवून त्यांच्याशी लग्न करावे आणि नंतर त्यांना वेश्याव्यवसायात ढकलावे असे सांगितले होते. आता पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. नगरसेवक फरार आहे. त्याच्या शोधासाठी छापे टाकले जात आहेत.

शुक्रवारी पोलिसांनी आरोपी साहिल आणि अल्ताफ यांना अटक केली. दोघांनीही काँग्रेस नगरसेवकाकडून पैसे घेतल्याचे मान्य केले आहे. आरोपी  साहिलने सांगितले की, हिंदू मुलीशी लग्न करण्यासाठी त्याला २ लाख रुपये देण्यात आले होते. अल्ताफने देखील मान्य केले की त्यालाही फक्त १ लाख रुपये मिळाले होते आणि काम पूर्ण झाल्यानंतर उर्वरित पैसे देण्याचे आश्वासन नगरसेवकाने दिले होते. दोघांच्याही वक्तव्यांचा व्हिडिओही व्हायरल होत आहे.

या व्हिडिओमध्ये लव्ह जिहादी साहिल आणि अल्ताफ त्यांच्या फोनमधील काही हिंदू मुलींचे फोटो देखील दाखवतात. त्यांनी सोशल मीडियावर हिंदू आयडी तयार करून या मुलींना फसवले होते. नंतर त्यांना भेटण्यासाठी बोलावले आणि त्यांच्यावर बलात्कार केला. त्यानंतर, त्यांच्याशी लग्न करून त्यांना धर्मांतर करायला लावण्याची योजना आखण्यात आली.

लव्ह जिहादींनी सांगितले की काँग्रेस नगरसेवकाने त्यांना या मुलींना ‘धंदा’ करायला लावण्यास सांगितले होते. लव्ह जिहादींच्या जबाबाच्या आधारे पोलिसांनी काँग्रेस नगरसेवक अन्वर कादरी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. यानंतर पोलीस त्याला अटक करण्यासाठी त्याच्या घरी पोहोचली असताना आरोपी नगरसेवक फरार झाला. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पोलिसांनी सांगितले की, आरोपी साहिल आणि अल्ताफ यांना सोमवार (१६ जून) पर्यंत रिमांडमध्ये ठेवून त्यांची चौकशी केली जात आहे.

हे ही वाचा : 

आतंकवादाविरोधात पाठिंबा दिल्याबद्दल आभार

इराणचे सर्वोच्च नेते खामेनी लपले बंकरमध्ये!

इराणमध्ये दहा हजारांहून अधिक अडकलेल्या भारतीयांना भूमार्गाद्वारे बाहेर पडण्याची मिळाली परवानगी!

दिल्लीमध्ये ३६ बांग्लादेशी नागरिक पकडले

खरे तर, बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी दोनही आरोपीना रंगेहाथ पकडले  होते आणि यानंतर ही माहिती उघड झाली. कार्यकर्त्यांनी दोघांनाही पकडून बाणगंगा पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यापैकी साहिल एका कार शोरूममध्ये काम करतो आणि अल्ताफ हा रंगकाम करणारा आहे.

बजरंग दलाने दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली. त्याचबरोबर या कटाला निधी देणारे काँग्रेस नगरसेवक अन्वर कादरी यांना तात्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली. यावर पोलिसांनी सांगितले की, दोन पीडित मुलींनी साहिल आणि अल्ताफविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. या आधारावर, मौनी बाबा आश्रमामागील सनवेर रोड बाणगंगा येथील रहिवासी २० वर्षीय अल्ताफ खान आणि नरवाल येथील रहिवासी साहिल शेख याच्याविरुद्ध बलात्कार आणि इतर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील कारवाई सुरु आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
339,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा