29.8 C
Mumbai
Wednesday, October 28, 2026
घरविशेषकोविड : देशासाठी मोठा दिलासा

कोविड : देशासाठी मोठा दिलासा

सक्रिय रुग्णसंख्या ७ हजारांच्या खाली

Google News Follow

कोविडच्या नव्या व्हेरिएंटचा प्रसार मंदावल्यामुळे भारताला मोठा दिलासा मिळाला आहे. सलग तिसऱ्या दिवशी देशात कोविड संक्रमणाच्या रुग्णसंख्येत घट नोंदवण्यात आली आहे. नव्या आकडेवारीनुसार देशातील सक्रिय कोविड रुग्णसंख्या आता ७ हजारांखाली आली आहे. ही माहिती केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिली आहे.

आरोग्य मंत्रालयाने १७ जून रोजी सकाळी ८ वाजेपर्यंतचे आकडे प्रसिद्ध केले आहेत. त्यानुसार, एका दिवसात देशभरात ४२८ सक्रिय रुग्णांची घट झाली आहे. त्यामुळे आता सक्रिय रुग्णांची संख्या केवळ ६८३६ इतकी राहिली आहे. त्याआधी सोमवारी ११९ रुग्णांची घट नोंदवण्यात आली होती. मंत्रालयाच्या माहितीनुसार, मागील २४ तासांमध्ये केरळमध्ये सर्वाधिक २६१ रुग्णांनी घट झाली आहे. त्यानंतर गुजरातमध्ये १८५, दिल्लीमध्ये ९४, महाराष्ट्रात २८, आंध्र प्रदेशमध्ये १८, सिक्कीममध्ये १३, आसाममध्ये ३, तर तेलंगणा, बिहार, छत्तीसगड आणि गोवा येथे प्रत्येकी १ रुग्ण कमी झाला आहे. या घसरणीनंतर केरळमध्ये एकूण सक्रिय रुग्णसंख्या १६५९, गुजरातमध्ये १२४८, कर्नाटकमध्ये ६९६, दिल्लीमध्ये ५५५, महाराष्ट्रात ५१२, उत्तर प्रदेशात २७८, राजस्थानात २५१, तामिळनाडूमध्ये २२२, आणि हरयाणामध्ये १०३ आहे.

हेही वाचा..

सॅन फ्रान्सिस्कोहून मुंबईकडे येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात बिघाड

१०० भारतीयांचा पहिला गट इराणहून अर्मेनियाला रवाना!

अयातुल्ला खमेनी यांना मारल्याने संघर्ष संपेल!

इस्रायलचा इराणी प्रसारण इमारतीवर हल्ला, टीव्ही अँकरने काढला पळ!

तथापि, काही राज्यांमध्ये रुग्णसंख्येत थोडी वाढही झाली आहे. कर्नाटकमध्ये सर्वाधिक १०५ नवे रुग्ण आढळले आहेत. राजस्थानमध्ये २९, हरयाणामध्ये १२, तर पंजाबमध्ये १० जणांना कोविडची लागण झाली आहे. त्याशिवाय, मणिपूरमध्ये ६, उत्तर प्रदेश व मध्य प्रदेशमध्ये प्रत्येकी ३, ओडिशा, त्रिपुरा व तामिळनाडूमध्ये २, आणि झारखंड, लडाख, नागालैंड व उत्तराखंडमध्ये प्रत्येकी १ रुग्ण आढळला आहे. गेल्या २४ तासांत कोविडमुळे संपूर्ण देशात एकच मृत्यू नोंदवण्यात आला आहे. महाराष्ट्रातील ४४ वर्षीय महिलेचा कोविड संसर्गामुळे मृत्यू झाला असल्याची माहिती मंत्रालयाने दिली आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
340,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा