31 C
Mumbai
Sunday, December 14, 2025
घरलाइफस्टाइलरघुजी राजे भोसले यांची ऐतिहासिक तलवार १५ ऑगस्टपूर्वी महाराष्ट्रात पोहोचेल

रघुजी राजे भोसले यांची ऐतिहासिक तलवार १५ ऑगस्टपूर्वी महाराष्ट्रात पोहोचेल

Google News Follow

Related

शूर मराठा सरदार रघुजी राजे भोसले यांची ऐतिहासिक तलवार जुलैच्या शेवटच्या आठवड्यात अथवा १५ ऑगस्टच्या आधी लंडनहून महाराष्ट्रात परत आणू, अशी माहिती राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री एँड आशिष शेलार यांनी आज दोन्ही सभागृहात दिली.

विधानसभा सभागृहामध्ये महाराष्ट्र विधानसभा नियम २९३ नुसार विधानसभेमध्ये सत्ताधारी पक्षाने जी चर्चा उपस्थित केली होती तसेच विधान परिषदेत मांडण्यात आलेल्या ठरावाला उत्तर देताना आज सांस्कृतिक कार्य विभागाचा मंत्री अँड आशिष शेलार यांनी उत्तर दिले.

यावेळी त्यांनी सांगितले की, नागपूरच्या भोसले घराण्यातील शूर मराठा सरदार राजे रघुजी भोसले यांची तलवार ही लिलावात निघाली होती आणि त्याला भारतामध्ये आणि आपल्या महाराष्ट्र सरकारची मालमत्ता समजून ती पुन्हा आणण्यासाठी एक चांगला प्रयोग, चांगला प्रयत्न हा महाराष्ट्र सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या प्रयत्नातून सफल झाला.

आपल्या इतिहासातली एक विरासत असलेली ही पराक्रमाची आपल्या मराठ्यांच्या पराक्रमाची असलेली तलवार ही आपण पुन्हा एकदा मिळवण्यात आपण सफल झालेलो आहोत. छत्रपती शाहू महाराजांच्या कारकिर्दीत रघुजी भोसले प्रथम १६९५ ते १७५५ हे मराठा सैन्यातील सेनापती होते नागपूरच्या भोसले घराण्याचे संस्थापक त्यांना केले.

शौर्यासाठी आणि युद्धनीतीसाठी रघुजी भोसले यांना ‘सेना साहेब सुभा’ ही पदवी छत्रपती शाहू महाराजांनी दिली. २९ एप्रिल २०२५ ला त्या ठिकाणी सोतेबायस लंडनमधल्या एका लिलाव करणाऱ्या कंपनीने ती तलवार ज्याच्यावर रघुजी भोसले यांचं नाव कोरलेला आहे आणि त्या तलवारीची वजमूठ सुद्धा सोन्याची आहे आणि या युद्धामध्ये पराक्रमात वापरली गेलेली तलवार कदाचित त्यावेळेला ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून भारतातून महाराष्ट्रातून परदेशात गेली.

त्या लंडनच्या लिलावात गेल्यावर आपण महाराष्ट्र सरकारच्यावतीने मा. मुख्यमंत्र्यांचे देवेंद्र फडणवीस यांनी या सगळ्याला ज्या गतीने परवानग्या मिळण्यामध्ये कार्यालयीन व्यवस्था उभ्या केल्या. त्या व्यवस्थेमध्ये प्रवीण चल्ला यांच्या माध्यामतून महाराष्ट्र शासनाने त्या लिलावात बोली केली आणि जवळ जवळ ६९ लाख ९४ हजार ४३७ करासहीत ही तलवार आपल्या ताब्यात घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली.

त्या व्यवस्थेबरोबर करारनामा आपला बदली झाला. त्यासाठीच्या खर्चास २१ मे २०२५ रोजी मान्यता दिली. आता कस्टम क्लीअरन्स, पॅकिंग, हाताळणी या सगळ्या बाबतीसाठी स्टार वर्ल्ड वाईड ग्रुप प्रा. लि. या कंपनीची नियुक्ती करून १५ ऑगस्टच्या आधी जुलै महिन्यातच आपल्या मराठ्यांच्या, मराठी माणसाच्या, महाराष्ट्राच्या पराक्रमाची साक्ष असलेली ही तलवार आपण सन्मानपूर्वक महाराष्ट्रात या भूमीमध्ये परत आणू आणि ती सगळ्यांना दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. अशी सविस्तर माहिती मंत्री शेलार यांनी सभागृहासमोर ठेवली.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा