27.9 C
Mumbai
Sunday, October 18, 2026
घरविशेषदिल्ली: कावड यात्रेदरम्यान मांस दुकाने राहतील बंद!

दिल्ली: कावड यात्रेदरम्यान मांस दुकाने राहतील बंद!

दिल्लीचे मंत्री कपिल मिश्रा यांची माहिती 

Google News Follow

दिल्लीचे मंत्री कपिल मिश्रा म्हणाले की, प्रशासन या वर्षी ११ ते २३ जुलै दरम्यान होणाऱ्या कावड यात्रेदरम्यान मांस दुकाने उघडी ठेवण्याची परवानगी देऊ शकत नाही. तथापि, ही बंदी फक्त कावड यात्रा मार्गावरील मांस दुकानांनाच लागू होईल की नाही हे त्यांनी स्पष्ट केले नाही.

“कावड यात्रेदरम्यान दिल्लीत मांस दुकाने बंद राहतील. हा आमचा निर्णय आहे. यातील बहुतेक मांस दुकाने बेकायदेशीर आहेत आणि कायद्यानुसार ती चालवली जाऊ नयेत,” असे मिश्रा यांनी पत्रकारांना सांगितले.

कावड यात्रा सुरू होत आहे, दारूची आणि मांस दुकाने बंद करण्याची मागणी अनेक ठिकाणांहून होत आहे, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावर मंत्री कपिल मिश्रा म्हणाले, ”दिल्लीत मागणीची गरजच नाही, अशी दुकाने कावड यात्रेदरम्यान बंद राहिली पाहिजेत असा निर्णय घेण्यात आला आहे. प्रत्येकाने कायद्याचे पालन केले पाहिजे. ही सर्व बेकायदेशीर दुकाने आहेत आणि आम्ही त्यांना कावड यात्रेदरम्यान चालवण्याची परवानगी देऊ शकत नाही.”

हे ही वाचा : 

गोपाळ खेमका हत्या प्रकरण: आरोपी चकमकीत ठार!

भाषेच्या वादावरून मीरा भाईंदरमध्ये गोंधळ, मनसे कार्यकर्ते ताब्यात!

या कारणासाठी पाकिस्तानचे संयुक्त राष्ट्रांमध्ये रडगाणं…

बिहार : अंधश्रद्धेतून झाली कुटुंबाची हत्या

तत्पूर्वी, दिल्लीतील भाजप आमदार तरविंदर सिंग मारवाह यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र लिहून राष्ट्रीय राजधानीतील कावड यात्रा मार्गांवरील सर्व दारू आणि मांसाची दुकाने तात्पुरती बंद करण्याची विनंती केली होती. मारवाह यांनी पुढे असा दावा केला की दारू आणि मांस दुकानांवर तात्पुरती बंदी घातल्याने यात्रेचे पावित्र्य राखण्यास मदत होईल आणि कोणत्याही अनुचित घटना टाळता येतील.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
338,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा