अभिनेता प्रियांशु पैन्यूली यांनी सांगितलं की, हर्नियाची शस्त्रक्रिया झाल्यामुळे त्यांना त्यांच्या फिटनेस रूटीनपासून दूर राहावं लागलं. फिटनेसला आपल्या आयुष्याचा अत्यावश्यक भाग मानणाऱ्या प्रियांशुसाठी हा निर्णय घेणं सोपं नव्हतं. प्रियांशु यांनी आपल्या अनुभवाबद्दल बोलताना सांगितलं, फिटनेस माझ्यासाठी नेहमीच खूप महत्त्वाचा राहिलाय. पण जेव्हा मला हर्नियाचं निदान झालं, तेव्हा शस्त्रक्रिया करावी लागली आणि वर्कआउट पूर्णपणे थांबवावं लागलं.”
त्यांनी स्पष्ट केलं की, हा टप्पा त्यांच्या मानसिक आणि शारीरिक दोन्ही दृष्टीने अत्यंत कठीण होता. “रिकव्हरीचा काळ खूप वेदनादायक होता, पण या दरम्यान मला एक गोष्ट लक्षात आली – कधी कधी थांबणं हेच सर्वात मोठं पाऊल असतं. मी कोणतीही घाई न करता स्वतःला पूर्णपणे बरे होण्यासाठी वेळ दिला. हा टप्पा माझ्यासाठी मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या खूप आव्हानात्मक होता. पण मी मानतो की आरोग्य हेच सर्वप्रथम असायला हवं,” असं प्रियांशु म्हणाले.
हेही वाचा..
गुजरात पुल दुर्घटनेत ९ जणांचा मृत्यू
तहव्वुर राणाची कोठडी १३ ऑगस्टपर्यंत वाढवली
छांगुर बाबा प्रकरणात ईडीकडून तपास
फरार मोनिका कपूरला अमेरिकेतून भारतात आणले
आता पूर्णपणे बरे झाल्यानंतर, प्रियांशु आपल्या फिटनेस रूटीनमध्ये नवीन जोमाने परतण्याची योजना आखत आहेत. “जेव्हा तुम्ही पुन्हा पूर्णपणे तंदुरुस्त होता, तेव्हा नव्या ऊर्जा आणि आत्मविश्वासाने परत येऊ शकता. आणि मी आता तेच करणार आहे,” असं त्यांनी सांगितलं. वर्कफ्रंटबाबत बोलायचं झालं, तर प्रियांशु लवकरच ‘पान परदा जर्दा’ या वेब सीरिजमध्ये झळकणार आहेत. ही मालिका मध्य भारतातील अफू तस्करीच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे.
या सीरिजमध्ये प्रियांशु पैन्यूलीसोबत गुरमीत सिंग, शिल्पी दासगुप्ता, मृगदीप सिंग लांबा आणि सुपर्ण एस. वर्मा हे दिग्दर्शक सहभागी आहेत, तर हुसैन दलाल, अब्बास दलाल, राधिका आनंद आणि विभा सिंग हे लेखक मंडळात आहेत. या सीरिजची घोषणा २०२३ साली करण्यात आली होती. याशिवाय, प्रियांशु लवकरच ‘तेरे इश्क में’ या चित्रपटातही दिसणार आहेत, ज्यामध्ये कृती सेनन आणि धनुष मुख्य भूमिकेत आहेत. ही फिल्म एकतर्फी प्रेम, आसक्ती आणि भावनिक संघर्ष यावर आधारित आहे. आनंद एल. राय यांच्या दिग्दर्शनात तयार झालेल्या या चित्रपटाला ए.आर. रहमान यांचं संगीत लाभलं आहे. हा चित्रपट २८ नोव्हेंबर रोजी हिंदी आणि तमिळ भाषांमध्ये सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.







