मोटोरोला कंपनीने आज बुधवारी (9 जुलै) भारतात मध्यम श्रेणीतील ग्राहकांसाठी मोटो जी 96 5G स्मार्टफोन लाँच केला आहे. या फोनसोबत 1 वर्षासाठी OS अपडेट्स आणि 3 वर्षांसाठी सुरक्षा अपडेट्स दिले जातील.
मोटो जी 96 5G मध्ये 6.67 इंचाचा FHD+ pOLED 3D कर्व्हड डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 144Hz रिफ्रेश रेट आणि 1600 निट्स पीक ब्राइटनेस सपोर्ट करतो. तो कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ने संरक्षित आहे आणि स्मार्ट वॉटर टच देखील सपोर्ट करतो.
या स्मार्टफोनमध्ये 5,500mAh बॅटरी आहे, जी 33W चार्जर सह येते. तसेच यामध्ये ड्युअल स्टीरिओ स्पीकर्स, डॉल्बी अॅटमॉस, हाय-रेझ ऑडिओ, आणि Mमोटो स्पेशियल साउंड देण्यात आला आहे. फोनला IP68 रेटिंग आहे म्हणजेच तो पाण्यापासून सुरक्षित आहे.
मोटो जी 96 5G मध्ये स्नॅपड्रॅगन 7s Gen 2 प्रोसेसर, 8GB LPDDR4X RAM आणि 256GB UFS 2.2 स्टोरेज आहे. यामध्ये 24GB पर्यंत व्हर्च्युअल रॅम वापरण्याचा पर्यायही आहे.
कॅमेराबाबत बोलायचं झालं तर, यात 50MPसोनी लिटिया 700C मुख्य कॅमेरा (OIS सह), 8MP अल्ट्रावाईड + मॅक्रो + डेप्थ सेन्सर आहे. सेल्फीसाठी 32MP फ्रंट कॅमेरा आहे जो 4K व्हिडीओ रेकॉर्डिंग करतो. यासोबत गुगल फोटो चे एआय टूल्स जसे की मॅजिक इरेजर, फोटो ब्लर अनब्लर, आणि म्याजिक एडिटर देखील दिले आहेत.
मोटो जी 96 5G दोन स्टोरेज व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध असेल:
- 8GB/128GB – ₹17,999
- 8GB/256GB – ₹19,999
हा स्मार्टफोन अॅश-ली ब्ल्यू , ग्री-नर पॅस्चर्स, कॅटलिया ऑर्किड आणि ड्रेस्डन ब्ल्यू या रंगांमध्ये उपलब्ध असेल. विक्री 16 जुलैपासून फ्लिपकार्ट, मोटोरोला च्या वेबसाइटवर आणि रिलायन्स डिजिटल सह देशभरातील प्रमुख रिटेल स्टोअर्समध्ये सुरू होईल.







