‘बिहार बंद’ दरम्यान पूर्णियामध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या गाडीवर चढण्यापासून अपक्ष खासदार पप्पू यादव आणि काँग्रेस नेते कन्हैया कुमार यांना रोखण्यात आले. या घटनेने आता राजकीय वादाला तोंड फोडले आहे. यावर भाजप नेते बृजभूषण शरण सिंह यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या मते, दोघांना रोखणे ही एक ठरवून केलेली रणनीती होती. गुरुवारी माध्यमांशी बोलताना बृजभूषण शरण सिंह म्हणाले, “पप्पू यादव आणि कन्हैया कुमार यांना जाणीवपूर्वक गाडीवरून ढकलण्यात आले, जेणेकरून निवडणुकीतील पराभवाचे खापर त्यांच्या माथी फोडता येईल आणि त्यांनाही दोषी ठरवता येईल. पप्पू यादव काही लोकसभा मतदारसंघांमध्ये मजबूत स्थितीत आहेत, तर कन्हैया कुमार हा ‘टुकडे-टुकडे गँग’चा हिस्सा आहे. त्यामुळेच दोघांना त्यांची औकात दाखवण्यात आली.
ते पुढे म्हणाले, “राहुल गांधी आणि तेजस्वी यादव हे ‘राजघराण्यातून’ आले आहेत. एकजण स्वतःला हिंदुस्थानचा राजा समजतो आणि दुसरा बिहारचा राजा. मग अशा परिस्थितीत ते कन्हैया कुमार आणि पप्पू यादव यांना कसे उभे राहू देतील? राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधत बृजभूषण म्हणाले, “बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वीच राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांनी हार मानली आहे. त्यामुळेच ते आताच तयारी करत आहेत की भाजप आणि नितीश कुमार यांच्यावर आरोप कसे करायचे. मी खात्रीने सांगतो की बिहारमध्ये त्यांचा पराभव निश्चित आहे, म्हणूनच ते आधीपासूनच निवडणूक आयोगावर आरोप करण्यास सुरुवात केली आहे.”
हेही वाचा..
हृदयविकाराच्या वाढत्या घटनांमुळे लोक घाबरले, म्हैसूरच्या रुग्णालयात लांब रांगा!
हिंदी-मराठी भाषावाद : अभिनेता जैन दुर्रानी काय म्हणाले ?
‘ऑपरेशन सिंदूर’ समर्पित ‘सिंदूर’ उड्डाणपुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले लोकार्पण!
बिहारमध्ये निवडणूक आयोगाच्या मतदार यादीच्या विशेष तपासणी प्रक्रियेबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केलं, “प्रत्येक निवडणुकीपूर्वी मतदार यादीचे पुनरावलोकन केले जाते. यात मृत व्यक्तींची नावे वगळली जातात आणि नव्या नावांची भर घातली जाते. ही प्रक्रिया बिहारपुरती मर्यादित नाही, तर संपूर्ण देशात होते. मात्र विरोधकांना हे माहीत आहे की, भाजपा आणि नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली आमचीच सत्ता येणार आहे, म्हणूनच ते आतापासून नुकसान नियंत्रणाची रणनीती आखत आहेत.” ते पुढे म्हणाले, “राहुल गांधीबद्दल बोलताना मला लाज वाटते. त्यांच्या उपस्थितीत ‘चुनाव आयोग मुर्दाबाद’ अशा घोषणा दिल्या जातात.”







