कर्नाटकातील उत्तर कन्नड जिल्ह्यातील गोकर्ण जवळील रामतीर्थ टेकडीवरील एका गुहेत एक रशियन महिला तिच्या मुलांसह आढळली. ४० वर्षीय नीना कुटीना, जिला मोही म्हणूनही ओळखले जाते, ती तिच्या दोन लहान मुली, ६ वर्षीय प्रेया आणि ४ वर्षीय अमा यांच्यासह येथे राहत होती. कुटीना २०१६ मध्ये बिझनेस व्हिसावर भारतात आली होती आणि २०१७ मध्ये तिचा व्हिसाची मुदत संपली होती. त्यानंतर, देश सोडण्याऐवजी तिने जंगलात आश्रय घेतला. या गुहेत रुद्राची मूर्ती, रशियन पुस्तके आणि हिंदू देव-देवतांचे फोटो देखील आढळले.
पोलिसांनी सांगितले की, या परिसरात भूस्खलन झाले आहे. भूस्खलनात ढिगाऱ्याखाली कोणी गाडले आहे का? हे पाहण्यासाठी पथक गस्त घालत होते. यावेळी जंगलात गस्ती दरम्यान एक गुहा दिसली. गुहेबाहेर काही कपडे दिसले. त्यावेळी हे सर्व पाहून एकच धक्का बसला. कारण एवढ्या घनदाट जंगलात कोण राहत असेल, असे विविध प्रश्न निर्माण झाले. जेव्हा गुहेत प्रवेश केला तेव्हा एक रशियन महिला दिसली, जी भगवान रुद्राची प्रतिमेची पूजा करत होती. तिथे एक मुलगी खेळत होती आणि दुसरी झोपली होती.
महिलेने सांगितले की ती हिमालयातील ऋषींसारखे जीवन जगत आहेत. शांती आणि अध्यात्माच्या शोधात भारतात आल्याचे तिने सांगितले. विशेष म्हणजे, तिने दावा केला कि सोबत असणाऱ्या मुलींना जंगलातच जन्म दिला. तसेच उदरनिर्वाहासाठी नैसर्गिक संसाधनांचा (फळे, फुले, पाने) वापर करत असल्याचे तिने सांगितले.
पोलसांना तिने सांगितले, साप आमचे मित्र आहेत, आम्ही त्यांना त्रास देत नाही तोपर्यंत ते आम्हाला काहीही करत नाहीत. यावेळी पोलिसांनी गुहेत आणि आजूबाजूच्या जंगलात शोध घेतला. या दरम्यान, नीना कुटीनाचा पासपोर्ट आणि कालबाह्य झालेला व्हिसा सापडला, जो १७ एप्रिल २०१७ रोजी संपला होता. कुटीनाने यापूर्वी दावा केला होता की तिचे कागदपत्रे हरवली आहेत. दरम्यान, २०१८ मध्ये एक्झिट परमिट मिळाल्यानंतर तिने नेपाळ गाठले आणि नेपाळ प्रवास केल्यानंतर रशियाला न जाता ती भारतात परतली आणि कर्नाटकच्या जंगलात राहू लागली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, अधिकाऱ्यांपासून वाचण्यासाठी हॉटेल्स आणि गर्दीची ठिकाणे टाळण्यासाठी कुटीनाने जंगलात आपले घर बनवले.
हे ही वाचा :
कविंदर गुप्ता लडाखचे नवे उपराज्यपाल
उद्धव ठाकरे-संजय राऊत यांची आगामी मुलाखत महाराष्ट्रासाठी कॉमेडी शो
अरेरे… पाकिस्तानमध्ये नालेही साफ नाहीत
दरम्यान, पोलिसांच्या पथकाने रशियन महिलेसह तिच्या दोन मुलींना ताब्यात घेतले आणि कुमटा तालुक्यातील एका आश्रमात पाठवले, याठिकाणी आश्रमातील स्वामी त्यांची काळजी घेत आहेत. आता कुटीन आणि तिच्या मुलींना रशियाला परत पाठवण्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू झाली आहे.
दरम्यान, या प्रकरणाबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. रशियन महिलेने दावा केला ही दोन मुलींना जंगलात जन्म दिला, परंतु ती मुले कोणाची आहेत हे मात्र तिने सांगितले नाही. या प्रकरणाचा तपास सध्या सुरु आहे. या घटनेमुळे स्थलांतर विभाग किंवा परदेशी नागरिक विभाग, पोलीस प्रशासनांवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.







