१३ जुलै रोजी तामिळ चित्रपट वेट्टुवन च्या शूटिंगदरम्यान एक भीषण अपघात घडला, ज्यात ज्येष्ठ स्टंट दिग्दर्शक एस. एम. राजू यांचा मृत्यू झाला. हा दुर्घटना तमिळनाडूतील नागपट्टिनम जिल्ह्यात झाली, जेव्हा अभिनेता आर्य यांच्या प्रमुख भूमिकेतील आणि पी. रणजीत दिग्दर्शित या चित्रपटासाठी धोकादायक कार-टॉपलिंग स्टंट शूट केला जात होता.
सेटवरील व्हिडिओ क्लिप्समध्ये एक भरधाव वेगाने जाणारी कार जोरात उलटताना दिसते. क्रू सदस्य तात्काळ धाव घेत घटनास्थळी पोहोचतात आणि कारमधून राजू यांना बाहेर काढतात. मात्र, या अपघातात राजू यांचा जागीच मृत्यू झाला होता. नियोजित स्टंट दृश्य दुर्दैवाने एक शोकांतिका ठरली.
कोलिवूडमध्ये शोक
एस. एम. राजू हे तामिळ चित्रपटसृष्टीतील एक मान्यताप्राप्त नाव होते. त्यांनी अनेक धाडसी आणि थरारक अॅक्शन सीन कोरिओग्राफ केले होते. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे संपूर्ण कोलिवूडमध्ये शोकाची लाट पसरली असून यानिमित्ताने शूटिंग सेटवर सुरक्षेच्या उपाययोजनांबद्दल पुन्हा चर्चेला तोंड फोडले आहे.
हे ही वाचा:
रॉबर्ट वाड्रा यांची ईडी कार्यालयात चौकशी
तस्करी प्रकरणात काँग्रेस ब्लॉक अध्यक्ष अटकेत
घुसखोरांना वैध मतदार मानणे चुकीचे
आपत्तीच्या १४ दिवसांनंतर मंडी जिल्ह्यात शाळा सुरु
अभिनेता विशाल, राजू यांच्यासोबत अनेक अॅक्शन चित्रपटांमध्ये काम करणारा अभिनेता विशाल याने आपल्या अधिकृत X (पूर्वीचे ट्विटर) हँडलवर दुःख व्यक्त केले, त्यांनी लिहिले की, “राजू यांनी आज सकाळी आर्य व रणजीत यांच्या चित्रपटासाठी कार टॉपलिंग सीक्वेन्स करताना जीव गमावला, हे पचवणे खूप कठीण आहे. त्यांना इतक्या वर्षांपासून ओळखतो आणि माझ्या अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी अनेक धोकादायक स्टंट केले होते. ते खूप धाडसी व्यक्तिमत्त्व होते.”
Stunt master SM Raju dies while performing high-risk car toppling stunt during film shoot in TN.
Sad! These're REAL unsung heroes who perform dangerous stunts for so-called Superstars who can't even ride a horse for 15 minutes. For that, they either get meagre payments or de@th. pic.twitter.com/oRZRz4MuIW
— BhikuMhatre (@MumbaichaDon) July 14, 2025
विशाल यांनी पुढे लिहिले, “मी मनापासून शोक व्यक्त करतो. राजू यांच्या आत्म्यास शांती लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. त्यांच्या कुटुंबाला या दुःखद प्रसंगातून सावरण्यासाठी शक्ती मिळो. हे फक्त एक ट्वीट नाही, तर पुढेही त्यांच्या कुटुंबाला मी आधार देईन. एक सहकारी म्हणून आणि त्यांचे योगदान लक्षात घेता, हे मी माझे कर्तव्य समजतो.”
शूटिंग स्थगित, चौकशी सुरू
या दुर्घटनेनंतर वेट्टुवन चे शूटिंग तात्पुरते थांबवण्यात आले असून, अधिकृत चौकशी सुरू झाली आहे. या घटनेने पुन्हा एकदा स्टंट कलाकारांवरील जोखीम अधोरेखित केली आहे आणि शूटिंग सेटवर अधिक कडक सुरक्षा नियमांची गरज असल्याचे स्पष्ट केले आहे.
सध्यातरी अभिनेता आर्य किंवा दिग्दर्शक रणजीत यांनी यावर कोणतेही अधिकृत वक्तव्य केलेले नाही.







