क्रिकेट इतिहासात एक अशी संध्याकाळ जेव्हा वेस्ट इंडीज क्रिकेटचा अभूतपूर्व अधःपात पाहायला मिळाला. केवळ २०४ धावांचा पाठलाग करताना संपूर्ण संघ २७ धावांत गारद झाला! हा टेस्ट क्रिकेटमधील दुसरा सर्वात कमी डाव ठरला आहे. आणि त्याचसोबत ऑस्ट्रेलियाने ही मालिका ३-० ने जिंकत क्लीन स्वीप केला.
वेस्ट इंडीजचा डाव – फक्त २७ धावा!
१९५५ मध्ये न्यूझीलंडचा इंग्लंडविरुद्ध २६ धावांत कोसळलेला डाव आजही नोंदवलेला आहे. आणि आता वेस्ट इंडीजचा २७ रनचा डाव दुसऱ्या क्रमांकावर.
या डावात केवळ जस्टिन ग्रीव्स (१०) हेच दहाच्या वर गेले. बाकी सगळे फलंदाज ऑस्ट्रेलियन गोलंदाजांसमोर पाय रोवू शकले नाहीत.
स्कॉट बोलंडची हॅटट्रिक – इतिहासात नोंद
स्कॉट बोलंडने १४व्या ओव्हरमध्ये सलग ३ बळी घेत हॅटट्रिक पूर्ण केली –
▪️ जस्टिन ग्रीव्स
▪️ शमर जोसेफ
▪️ जोमेल वारिकन
बोलंड टेस्ट क्रिकेटमध्ये हॅटट्रिक करणारा १०वा ऑस्ट्रेलियन, आणि पिंक बॉल टेस्टमध्ये हॅटट्रिक करणारा पहिला क्रिकेटपटू ठरला.
मिचेल स्टार्कची सात ओव्हरमध्ये तब्बल ६ बळींची आग
स्टार्कने केवळ ९ धावा देत ६ गडी टिपले. स्कॉट बोलंडने २ ओव्हरमध्ये २ रन देत ३ बळी घेतले. हेजलवुडनेही एक गडी बाद केला.
सामन्याचा संक्षिप्त आढावा:
-
पहली डाव (ऑस्ट्रेलिया): २२५
-
पहिली डाव (वेस्ट इंडीज): १४३
-
दुसरी डाव (ऑस्ट्रेलिया): १२१
-
लक्ष्य (वेस्ट इंडीजसाठी): २०४
-
दुसरी डाव (वेस्ट इंडीज): २७ ऑलआउट
वेस्ट इंडीज क्रिकेटचं अधःपतन?
एकेकाळी जगावर राज्य करणारी वेस्ट इंडीजची टीम आता १०० च्या आत बाद होणे सामान्य बनले आहे. आता फक्त इतिहासाची आठवण आणि पुन्हा उभारणीचा प्रश्न उरतोय.







