कर्नाटकमधील गडग जिल्ह्यात एका हिंदू युवकाने आपल्या मुस्लिम पत्नीवर व तिच्या कुटुंबीयांवर लग्नानंतर जबरदस्तीने इस्लाम स्वीकारायला लावल्याचा आरोप केला आहे. विशाल गोकवे असे या युवकाचे नाव असून त्याने तेहसीन होसामानी हिच्याशी तीन वर्षांच्या प्रेमसंबंधानंतर २६ नोव्हेंबर २०२४ रोजी ‘स्पेशल मॅरेज ॲक्ट’ अंतर्गत नोंदणी विवाह केला होता. मात्र विशालचा आरोप आहे की, २५ एप्रिल २०२५ रोजी मुस्लिम पद्धतीने दुसरा विवाह घडवून आणण्यात आला आणि त्यावेळी त्याचं इस्लाममध्ये धर्मांतर जबरदस्तीने केलं.
धमकी, छळ आणि मानसिक त्रास
विशालने व्हिडिओ व निवेदनांमधून दावा केला आहे की, तेहसीन व तिच्या कुटुंबीयांनी त्याला धर्मांतरासाठी धमकावले. ‘जर धर्मांतर केलं नाही, तर तुझ्यावर बलात्काराचा खोटा खटला दाखल करू’, अशी धमकी देण्यात आली. त्याला नमाज पढण्यास भाग पाडलं गेलं, आणि फोटो पाठवण्यास सांगितलं, जेणेकरून ते सिद्ध करता येईल.
विशालने सांगितली कहाणी
“ती म्हणायची की, ‘जर तू माझ्याशी लग्न नाही केलंस तर मी ट्रेनखाली उडी मारेन, विष पिऊन मरेन किंवा जमिनीवर लोळत मरेन.’ मी घाबरलो आणि नोंदणी विवाह केला,” असं विशालने सांगितलं. त्याने पुढे म्हटले, “लग्नानंतर तिचा मामा इब्राहिम साब दावल खान व आई बेगम बानो यांनी तिला सांगितलं की मला इस्लाममध्ये धर्मांतरित करावं आणि जमातमध्ये सामील करावं. तेहसीनने हे मला सांगितलं. मी इस्लामिक रितीरिवाजांनुसार लग्न करण्यास नकार दिला, तेव्हा जमातचे लोक आले आणि दबाव आणू लागले, असा गंभीर आरोप त्याने केला.
हे ही वाचा:
हायपरमार्केटच्या भीषण आगीत ५० जणांचा मृत्यू
अंदमान समुद्रात अनेक तेल क्षेत्रे सापडण्याची अपेक्षा
त्या निष्पाप मृत्यूंना जबाबदार आरसीबीच!
नवी मुंबईत 18 तास पाणी पुरवठा बंद
नमाजचे फोटो पाठवण्याची सक्ती
विशालने सांगितले की, तिचा मामा त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी पाठवण्यात आला. नमाज पढल्याचे फोटो काढून तेहसीनला पाठवावे लागत आणि ती दररोज विचारायची की, ‘आज नमाज केलीस का?’
‘लव्ह जिहाद’चा आरोप
या संपूर्ण घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, काही हिंदू संघटनांनी याला ‘लव्ह जिहाद’ म्हणून संबोधले आहे आणि तेहसीन व तिच्या कुटुंबीयांवर कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे.
गडगचे पोलिस अधीक्षक रोहन जगदीश यांनी सांगितले की, “हा व्हिडिओ काल सोशल मीडियावर व्हायरल झाला. दोघांचे नाते तीन वर्षांपासून होते. त्यांनी २६ नोव्हेंबर २०२४ रोजी विशेष विवाह कायद्यानुसार लग्न केलं. ५ महिन्यांनंतर मुस्लिम पद्धतीने दुसरं लग्न झालं, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर फिरतो आहे. त्यांनी हेही स्पष्ट केले की, २३ मे २०२५ रोजी विशालला बोलावून विचारणा करण्यात आली. त्याने तक्रार नसल्याचे लेखी व व्हिडिओ स्वरूपात दिले. तरीही, जर तक्रार आली, तर कायदेशीर कारवाई केली जाईल.







