अलीकडेच एका कामानिमित्त बँक ऑफ बडोदा एमडी सीईओ देबदत्त चांद यांची माझी भेट झाली. काही वेळातच त्यांनी हे काम मार्गी लावलं. मला हे अनपेक्षित होतं. आजवर फार कमी लोकांकडून मला असा अनुभव आला आहे. त्यानंतर दोन-तीन कार्यक्रमांमध्ये आम्ही भेटलो. आज बँक ऑफ बडोदाचा ११८ वा वर्धापनदिन आहे. एक विशेष कार्यक्रम आयोजित केलेला आहे, तुम्ही नक्की या असा आग्रह करणारा फोन आज मला बँकेतून आला. त्या निमित्ताने पुन्हा एकदा बँक ऑफ बडोदाचे तरुण आणि धडाकेबाज सीईओ देबदत्त चांद यांच्यासोबत झालेल्या पहिल्या भेटीची आठवण झाली. बँकिंग असो वा अन्य कोणतेही क्षेत्र, नेतृत्व आणि दूरदृष्टी हे दोन गुण अनिवार्य आहेत त्याशिवाय यश अशक्य. नेतृत्वगुणांची चुणूक देबदत्त चांद यांनी वेळोवेळी दाखवली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली बँक ऑफ बडोदा नवनवी उंची गाठत आहे.

देबदत्त चांद यांचा बँकिंग क्षेत्रातील अनुभव खूप मोठा आहे. त्यांनी कारकिर्दीची सुरुवात १९९४ मध्ये केली आणि विविध बँकिंग संस्थांमध्ये महत्त्वपूर्ण पदांवर काम केले. त्यांच्याकडे कॉर्पोरेट बँकिंग, रिटेल बँकिंग, आंतरराष्ट्रीय बँकिंग आणि ट्रेझरी ऑपरेशन्स यांसारख्या विविध क्षेत्रांचा सखोल अनुभव आहे. त्यांचा हा व्यापक अनुभव त्यांना बँकेच्या धोरणात्मक निर्णयांमध्ये आणि विकासात्मक योजनांमध्ये अमूल्य योगदान देण्यास मदत करतो.
बँक ऑफ बडोदाचे एमडी आणि सीईओ म्हणून, देबदत्त चांद यांनी बँकेच्या डिजिटलायझेशनवर विशेष भर दिला आहे. आजच्या वेगवान जगात तंत्रज्ञानाचा वापर अपरिहार्य आहे. त्याचा वापर कसा करायचा याची अचूक जाण देवदत्त यांना आहे. ग्राहकांसाठी सेवा देणाऱ्या खाजगी आणि सरकारी बँकांची संख्या खूप मोठी आहे. त्यामुळे चुरस ही खूप तीव्र आहे. जर तुम्हाला बँकेचा विस्तार करायचा असेल, वेगाने आगेकूच करायची असेल तर ग्राहकाला केंद्रस्थानी मानल्याशिवाय हे शक्य नाही. ग्राहकांना उत्तम सेवा द्यायची असेल तर आधुनिक आणि सुटसुटीत तंत्रज्ञान हवेच. ग्राहकांना अधिक चांगल्या आणि सोप्या सेवा देण्यासाठी डिजिटल माध्यमांचा जास्तीत जास्त वापर करण्यावर त्यांचा भर असतो. यामुळे केवळ ग्राहकांचा अनुभव सुधारत नाही, तर बँकेची कार्यक्षमता देखील वाढते.
त्यांच्या नेतृत्वाखाली बँक ऑफ बडोदाने आर्थिक समावेशकता (financial inclusion) वाढवण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत. शहरी भागात बँकिंग सेवांचा चांगला विस्तार झालेला आहे. तुलनेने ग्रामीण क्षेत्र मागे आहे. त्यामुळे इथेच विस्ताराची उत्तम संधी आहे. ग्रामीण भागातील लोकांसाठी बँकिंग सेवा सुलभ करणे आणि त्यांना आर्थिक प्रवाहात आणणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे. यातून बँकेचा विस्तार आणि ग्रामीण भागातील ग्राहकांना सेवा अशी दुहेरी उद्दिष्ट पूर्ण होत आहेत.
बँकांचा नफा कर्ज वितरणावर अवलंबून असतो. ग्राहकांना सुद्धा वैयक्तिक गरजा किंवा व्यावसायिक कामांसाठी वित्त पुरवठ्याची गरज असते. योग्य दिशेने झालेला वित्तपुरवठा नेहमीच देशाच्या आर्थिक वाटचालीमध्ये योगदान देत असतो. नवे उद्योजक निर्माण करत असतो. असलेले उद्योजक टिकवत असतो. त्यांच्या कक्षा वाढवत असतो. त्यामुळेकर्ज वितरण प्रक्रिया सुलभ करण्यावर त्यांनी भर दिलेला आहे. एमएसएमई (MSME) क्षेत्राला कर्ज पुरवठ्याच्या माध्यमातून अधिक बळकटी देता येईल हे त्यांना ठाऊक आहे. याच भावनेतून छोट्या आणि मध्यम उद्योगांना पाठिंबा देण्याचे धोरण त्यांनी राबवले आहे. व्यवसायाच्या उपलब्ध संधी साधताना नवीन व्यवसाय संधी शोधण्यावर त्यांचा भर असतो.
देबदत्त चांद हे केवळ एक कार्यक्षम प्रशासक नाहीत, तर ते एक दूरदृष्टी असलेले नेते देखील आहेत. भविष्यातील बँकिंगच्या गरजा ओळखून त्यानुसार धोरणे आखणे आणि बँकेला त्या दिशेने नेणे हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली बँक ऑफ बडोदा अधिक मजबूत, स्थिर आणि ग्राहकाभिमुख होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. त्यांचे नेतृत्व बँकेला भविष्यात अधिक यश मिळवून देईल यात शंका नाही. त्यांच्या आणि बँक ऑफ बडोदाच्या दमदार वाटचालीसाठी बँकेचे ग्राहक म्हणून माझ्या शुभेच्छा आहेत.







