जन्म प्रमाणपत्र घोटाळया प्रकरणी मराठवाड्यातून मोठी बातमी समोर आली आहे. मराठवाड्यात १२,९६५ जन्म प्रमाणपत्रे रद्द करण्यात आली आहेत. भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी ट्वीटकरत ही माहिती दिली. ते म्हणाले, ५००० प्रमाणपत्र परत घेतली असून ७,९६५ प्रमाणपत्रे येत्या १५ ऑगस्टपर्यंत परत घेतली जाणार आहेत.
मालेगावमध्ये जन्मप्रमाणपत्र घोटाळा समोर आल्यानंतर मालेगावातील आत्तापर्यंत ३९७७ जन्म प्रमाणपत्र रद्द करण्यात आली आहेत तर या घोटाळ्या प्रकरणी सुमारे ६० जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी अजून तपासणी सुरु आहे. याच दरम्यान आता मराठवाड्यात १२,९६५ जन्म प्रमाणपत्रे रद्द करण्यात आली आहेत.
लोकमतने दिलेल्या बातमीनुसार, मराठवाड्यात १२ हजार ९६५ जन्म प्रमाणपत्रे रद्द केली आहेत. शासन आदेशाने प्रमाणपत्रे रद्द केली असून, त्यातील ५ हजार प्रमाणपत्रे शासनाने परत घेतली आहेत, तर ७९६५ प्रमाणपत्रे येत्या १५ ऑगस्टपर्यंत परत घेण्याचे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी (२३ जुलै) प्रशासनाला दिले.
हे ही वाचा :
पुढील उपराष्ट्रपती जेडीयूचा नाहीतर भाजपाचा असेल!
पुढील उपराष्ट्रपती जेडीयूचा नाहीतर भाजपाचा असेल!
पंतप्रधान मोदी ब्रिटनमध्ये पोहोचले, लंडनमध्ये जोरदार स्वागत!
आता पवारच म्हणाले, ‘अकेला देवेंद्र काफी है’ |
महसूल मंत्र्यांनी बुधवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा घेतला. विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांच्यासह सर्व जिल्हाधिकारी ऑनलाइन बैठकीस हजर होते. राज्यात अनेक ठिकाणी बांगलादेशी, रोहिंग्यांनी बेकायदेशीररीत्या जन्म प्रमाणपत्रे काढल्याची तक्रार भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली होती. त्यावरून राज्यात काही ठिकाणी गुन्हेदेखील दाखल केले. नायब तहसीलदारांनी दिलेली सर्व जन्म प्रमाणपत्रे रद्द करण्याचे आदेश शासनाने दिले होते.
जन्म प्रमाणपत्र घोटाळा
मराठवाड्यात 12,965 जन्म प्रमाणपत्रे रद्द
5000 प्रमाणपत्र परत घेतली
7,965 प्रमाणपत्रे येत्या 15 ऑगस्टपर्यंत परत घेणार pic.twitter.com/jNaJBfQMHj
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) July 24, 2025







