30.8 C
Mumbai
Monday, October 26, 2026
घरक्राईमनामामुंबईत हाय- प्रोफाइल सेक्स रॅकेटचा भंडाफोड

मुंबईत हाय- प्रोफाइल सेक्स रॅकेटचा भंडाफोड

एकाला अटक तर तीन पीडित महिलांची सुटका

Google News Follow

मुंबईच्या अंधेरी येथील एका हॉटेलमध्ये परदेशी नागरिकांचा समावेश असलेल्या हाय-प्रोफाइल सेक्स रॅकेटचा एमआयडीसी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली असून 3 व्हिएतनामी महिलांची सुटका केली.

यासंदर्भातील माहितीनुसार, अंधेरी-कुर्ला रोडवरील टाइम्स स्क्वेअरजवळील एम्पायर सूट हॉटेलमधून हे बेकायदेशीर रॅकेट चालवले जात असल्याचे माहिती पोलिसांना मिळाली.

या गुप्त माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी एमआयडीसी पोलिसांना माहितीची पडताळणी करून त्वरित कारवाई करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून एका व्यक्तीला अटक केली आणि तीन व्हिएतनामी महिलांची सुटका केली, ज्यांना वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले.

याप्रकरणी या महिलांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपी मॅनेजर या महिलांचे फोटो ग्राहकांना ऑनलाइन शेअर करायचा आणि नंतर त्यांना हॉटेलमध्ये पाठवून द्यायचा, असे महिलांनी पोलिसांत माहिती दिली. पोलीस अधिक तपास करीत आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
340,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा