‘भोंगे मुक्त महाराष्ट्र’ मोहीम राबवत राज्यातील बेकायदेशीर भोंग्यांविरोधात भाजपा नेते किरीट सोमय्या वारंवार आवाज उठवत आहेत. किरीट सोमय्या यांच्या या मोहिमेला यश मिळत आहे. आतापर्यंत अनेक मशिदींवरील अनधिकृत भोंगे खाली उतरवण्यात आले आहेत, उतरवले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर सोमय्या यांनी पुण्यातील मशिदींवरील अनधिकृत भोंग्यांविरोधात आवाज उठवला आहे. दिवसातून पाच वेळा गोंगाट करणारे हे भोंगे खाली उतरवून ‘भोंगे मुक्त पुणे’ करणार असल्याचे सोमय्या यांनी म्हटले आहे.
किरीट सोमय्या म्हणाले, भोंगे मुक्त पुणे जिल्हा करायचा आहे. पुणे ग्रामीण जिल्ह्यात ३०८ मशिदींवर भोंगे/लाऊडस्पीकर लावण्यात आले आहेत. दिवसातून पाच वेळा गोंगाट करतात. यातील केवळ ५२ मशिदींनी भोंगे/लाऊडस्पीकर लावण्याची परवानगी घेतली आहे. तर २५६ मशिदींनी परवानगी न घेता रोज पाच वेळा भोंग्यांचा गोंगाट करत आहेत. हे बंद करावच लागणार, भोंगे मुक्त महाराष्ट्र, भोंगे मुक्त पुणे करणार, असे सोमय्या म्हणाले.
हे ही वाचा :
रिटायरमेंटनंतर अग्निवीरांना पोलीस भरतीत मिळणार २० टक्के आरक्षण
तेजस्वी निवडणूक का लढवणार नाही, हे स्पष्ट करा
सिस्तान-बलूचिस्तान प्रांतात दहशतवादी हल्ला
धर्मांतर प्रकरणात छांगूरच्या पुतण्याच्या घरावर बुलडोजर
दरम्यान, मुंबई पोलिसांनी गेल्या ३ महिन्यांत मशिदींमधील १५०० हून अधिक बेकायदेशीर लाउडस्पीकर हटवले होते. मागील महिन्यात सोमय्या यांनी ट्वीटकरत याची माहिती दिली होती. कोर्टाच्या आदेशानंतर आणि सुरू करण्यात आलेल्या मोहिमेनंतर ८०० हून अधिक मशिदीच्या ट्रस्टींनी स्पीकरसाठी परवानगी मागितली असल्याचे त्यांनी सांगितले होते.







