उत्तर प्रदेशच्या मैनपुरी खासदार डिंपल यादव यांच्या कपड्यांबद्दल वादग्रस्त विधान करणारे मौलाना साजिद रशिदी यांना नोएडामध्ये मारहाण करण्यात आली आहे. एका टीव्ही शो दरम्यान सपा कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर हल्ला केला आणि त्यांना कानफटवले. मौलाना साजिद रशिदी हे अखिल भारतीय इमाम असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. या प्रकरणात मौलाना यांनी सेक्टर-१२६ पोलिस स्टेशन गाठले आणि पोलिसांकडे तक्रार केली, त्यानंतर सेक्टर-१२६ पोलिस स्टेशनचे प्रभारी निरीक्षक भूपेंद्र बालियान यांनी सांगितले की, पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्या पत्नी डिंपल यादव यांच्याबद्दल मौलाना साजिद रशिदी यांनी वादग्रस्त विधान केले होते. खरंतर डिंपल यादव काही दिवसांपूर्वी एका मशिदीत गेल्या होत्या. यादरम्यान मौलाना साजिद रशिदी यांनी डिंपलने घातलेल्या कपड्यांबद्दल वादग्रस्त विधान केले होते.
वादग्रस्त विधानानंतर मौलाना साजिद रशिदी हे चर्चेत होते आणि त्यांच्यावर टीका होत होती. दरम्यान, ते एका टीव्ही चॅनलच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी नोएडाला पोहोचले होते. यादरम्यान सपाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर हल्ला केला आणि त्यांना कानफटवले.
हे ही वाचा :
अमेरिका-भारत व्यापार करार अद्याप अंतिम नाही, २५ टक्के कर लादणार!
‘भाई वीरेंद्र तो मोहरा है, लालू यादव असली चेहरा हैं’
आपत्कालीन वॉर्डमध्ये डॉक्टर झोपले, रुग्णाचा मृत्यू!
Ujjain: वर्षातून फक्त नागपंचमीच्या दिवशीच उघडते नागचंद्रेश्वर मंदिराचे दरवाजे, जाणून घ्या कारण
सपा कार्यकर्त्यांनी स्वतः या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला. या प्रकरणात, समाजवादी पक्षाच्या छात्र सभेचे गौतम बुद्ध नगर जिल्हा अध्यक्ष मोहित नगर यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आणि म्हटले की, डिंपल यादव यांच्यावरील वादग्रस्त टिप्पणीमुळे मौलाना आणि सपा कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला आणि सपाच्या लोकांनी त्यांना मारहाण केली. मोहित नागर म्हणाले, “मौलाना एका विशिष्ट पक्षाचे एजंट बनले आहेत. जर मौलानांनी माफी मागितली नाही तर त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला जाईल.”







