कर्नाटक जेडीएसचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा यांना शुक्रवारी (१ ऑगस्ट) लोकप्रतिनिधींच्या विशेष न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या बलात्काराच्या प्रकरणात दोषी ठरवले. न्यायालय उद्या शिक्षा सुनावणार आहे. म्हैसूरच्या केआर नगर येथील एका घरकाम करणाऱ्या महिलेने दाखल केलेल्या तक्रारीवरून गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) सायबर गुन्हे ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तक्रारदार महिलेने आरोप केला होता की प्रज्वल रेवण्णाने तिच्यावर बलात्कार केला आणि हे कृत्य व्हिडिओमध्ये रेकॉर्ड केले.
या प्रकरणी प्रज्वल रेवण्णावर भारतीय दंड संहितेच्या (IPC) कलम ३७६(२)(k), ३७६(२)(n), ३५४(A), ३५४(B), ३५४(C), ५०६, २०१ आणि माहिती तंत्रज्ञान (IT) कायद्याच्या कलम ६६ यासह अनेक कलमांखाली हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सीआयडीच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) या प्रकरणाचा तपास केला आणि सुमारे २००० पानांचे आरोपपत्र सादर केले. निरीक्षक शोभा आणि त्यांच्या पथकाच्या नेतृत्वाखालील तपासादरम्यान एकूण १२३ पुरावे गोळा करण्यात आले.
हे ही वाचा :
राहुल गांधींचे वर्तन सहन करण्यापलिकडे, ते देशाचा द्वेष करू लागलेत!
कोलकातामध्ये बांगलादेशी मॉडेलला अटक!
‘ऑपरेशन महादेव’नंतर ‘ऑपरेशन शिवशक्ती’ सुरू, १०० दिवसांत १२ दहशतवादी ठार!
शुभमन गिलची ऐतिहासिक कामगिरी – गावस्कर आणि सोबर्सच्या विक्रमांवर मोहर!
खटला ३१ डिसेंबर २०२४ रोजी सुरू झाला आणि न्यायालयाने २३ साक्षीदारांची तपासणी केली. त्यात व्हिडिओ क्लिप्सचे फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (FSL) अहवाल तसेच गुन्ह्याच्या ठिकाणाहून घेतलेले घटनास्थळ निरीक्षण अहवाल देखील विचारात घेतले. राज्य सरकारतर्फे विशेष सरकारी वकील बी.एन. जगदीश आणि अशोक नाईक यांनी बाजू मांडली, तर वरिष्ठ वकील नलिना मायागौडा आणि अरुण जी यांनी प्रज्वल रेवण्णा यांची बाजू मांडली. अखेर प्रज्वल रेवण्णावर दाखल झालेल्या चार बलात्काराच्या गुन्ह्यांपैकी एका प्रकरणात त्याला दोषी ठरवण्यात आले. आता न्यायालय उद्या शिक्षा सुनावणार आहे.







