महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी विद्यार्थी सेनेच्या विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या गुरुवारी घोषित केल्या. त्यात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या प्रमुख संघटकपदी मिलिंद घाग यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सरचिटणीस, प्रमुख संघटक आणि सचिव अशा विविध नियुक्त्यांची घोषणा ३१ जुलै रोजी करण्यात आली आहे. विद्यार्थी सेनेचे सरचिटणीस म्हणून गजानन काळे, संतोष गांगुर्डे, ऍड. स्नेहल अडारकर, संदीप पाचंगे, राजीव जावळीकर यांची नियुक्ती करण्यात आली असून प्रमुख संघटक म्हणून मिलिंद घाग यांच्यासह यश सरदेसाई, चेतन पेडणेकर, प्रशांत कनोजिया, ऍड. दीपक शर्मा यांची निवड करण्यात आली आहे. सचिव म्हणून आशीष साबळे-पाटील, शमिका पेडणेकर, सोनाली पाटील, प्रमोद मांढरे, नितीन ननावरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
हे ही वाचा:
“मतांसाठी हिंदूंना दहशतवादी म्हटले”
उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक ९ सप्टेंबरला!
कोलकातामध्ये बांगलादेशी मॉडेलला अटक!
महाराष्ट्रातील सर्वात प्रबळ आणि प्रभावी विद्यार्थी संघटना म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची ओळख निर्माण करण्यासाठी माझ्यासोबत तुम्ही झपाटून काम कराल, अशी अपेक्षा अमित ठाकरे यांनी या नियुक्त्यांची घोषणा करताना व्यक्त केली आहे.
मिलिंद घाग यांनी या नियुक्तीबद्दल आनंद व्यक्त करत आपल्यावर दाखविलेला विश्वास सार्थ करून दाखविणार असल्याचे म्हटले आहे.







