“नबान्न चलो” आंदोलनादरम्यान ममता बॅनर्जी यांच्या सरकारने आणि पोलिसांनी आंदोलनकर्त्यांवर केलेल्या कथित अमानवी अत्याचाराचा आता देशभरात निषेध होत आहे. भाजपने आरोप केला आहे की, कोलकात्याचे पोलिस आयुक्त मनोज वर्मा यांच्या नेतृत्वाखालील पोलिसांनी केवळ आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज केला नाही, तर देशाच्या राष्ट्रीय झेंड्याचाही अपमान केला.
भाजपच्या म्हणण्यानुसार, रस्त्यावर पडलेल्या तिरंग्याला उचलण्यासाठी गेलेल्या एका राष्ट्रभक्त युवकावर पोलिसांनी जाणीवपूर्वक हल्ला केला. तिरंग्याचा अपमान आणि त्याचे संरक्षण करणाऱ्यांवर अत्याचार, हे देशविरोधी कृत्य असल्याचा आरोप भाजपने केला आहे. या घटनेचा व्हिडीओ भाजपाचे नेते सुवेंदू अधिकारी यांना ट्वीट केला आहे, ज्यामध्ये एक निदर्शक खाली पडलेला भारताचा झेंडा उचलण्याचा प्रयत्न करत आहे, तर उपस्थित पोलीस त्याला मारत असताना दिसत आहेत.
भाजपचे नेते आणि आमदार श्री शंकर घोष यांनी सीपी मनोज वर्मा यांच्यासह संबंधित पोलिस अधिकाऱ्यांविरोधात आधीच तक्रार दाखल केली असून, भाजपने जाहीर केलं आहे की, “आम्ही हे प्रकरण तिथेच सोडणार नाही – याचा शेवट पाहिल्याशिवाय राहणार नाही.” “भारतमातेचा आणि तिरंग्याचा अपमान कोणीही केला, तर हिंदुस्थान शांत बसणार नाही,” असा इशारा भाजपने दिला आहे.
हे ही वाचा :
“ऑपरेशन सिंदूरवर प्रश्न म्हणजे पाकिस्तानला ऑक्सिजन देण्यासारखे”
कोहली, एबी डिव्हिलियर्स, यश दयालसह अनेकांचा छत्तीसगढच्या युवकाला फोन!
रेल्वे नेटवर्कमध्ये ऑपरेशनल वंदे भारत ट्रेन्सची संख्या १४४ पर्यंत
वंदे भारत : मंत्री जितेंद्र सिंह यांनी जम्मूच्या नागरिकांना शुभेच्छा
दरम्यान, आरजी कर हॉस्पिटल बलात्कार हत्या प्रकरणाला काल (९ ऑगस्ट) एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त ‘नबन्ना अभियान’ रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी निदर्शकांनी बॅरिकेड्स तोडून नबन्नाकडे (पश्चिम बंगाल सचिवालय) कूच करण्याचा प्रयत्न केल्याने गोंधळ निर्माण झाला, पोलिसांनी निदर्शकांवर लाठीचार्ज केला. यावेळी पीडितेच्या आईने आरोप केला की पोलिसांनी तिच्यावर हल्ला केला आणि तिच्या बांगड्या तोडल्या.
ভারত মাতার অপমান,
মানবে না হিন্দুস্তান।মমতা পুলিশ গতকাল নবান্ন চলো'র আন্দোলনকারীদের সাথে কেমন নির্মম অত্যাচার করেছে তা পুরো বিশ্ব অবগত হয়েছে। এই মনোজ বর্মা এবং তার নেতৃত্বাধীন পুলিশ দেশের জাতীয় পতাকা-কেও অপমান করতে ছাড়েনি। জাতীয় পতাকা-কে পদদলিত করে তার অপমান তো করেছেই… pic.twitter.com/YLznIR8bpY
— Suvendu Adhikari (@SuvenduWB) August 10, 2025







