33 C
Mumbai
Monday, November 23, 2026
घरदेश दुनियाअसीम मुनीर लष्कर प्रमुख कुठले ते तर दहशतवादी नेते!

असीम मुनीर लष्कर प्रमुख कुठले ते तर दहशतवादी नेते!

पाकिस्तानच्या अणु धमकीवर भाजप नेते हेमांग जोशींची प्रतिक्रिया

Google News Follow

पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी भारताला दिलेल्या अणु धमकीवर भाजप नेते हेमांग जोशी यांनी प्रतिक्रिया देत त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. असीम मुनीर हे पाकिस्तानचे लष्करप्रमुख नसून दहशतवादी नेता असल्याचे हेमांग जोशी यांनी म्हटले आहे.

एएनआयशी संवाद साधताना जोशी म्हणाले, “ते लष्करप्रमुख नाही, तर दहशतवादी नेता आहेत. त्याची वक्तव्यं नेहमी भारत-पाकिस्तानमधील तणाव वाढवण्याचं काम करतात. त्यांच्या वक्तव्यानंतर तणाव निर्माण झाल्याच्या अनेक घटना आहेत. पण मला असं वाटतं की ते अशा प्रकारचे प्रयत्न करतील, तेव्हा भारत याला योग्य उत्तर देईल. त्यांनी कधीही भारताच्या क्षमतेला कमी लेखण्याचा प्रयत्न करू नये.”

दरम्यान, अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेल्या पाक लष्कर प्रमुख मुनीर यांनी भारताला अणुहल्ल्याची धमकी दिली. भारताकडून अस्तित्वाचा धोका निर्माण झाल्यास इस्लामाबाद “अर्धे जग नष्ट करेल”. अणुशक्तीसंपन्न राष्ट्र असल्याने आम्ही खाली जातोय असे वाटल्यास अर्धे जग आपल्यासोबत घेऊन जाऊ, असे असीम मुनीर म्हणाले.

हे ही वाचा : 

सोमवारी अक्षरा सिंह महादेव भक्तीत तल्लीन

अवयवदानावर ‘गार्ड ऑफ ऑनर’!

रॅपर वेदान विरुद्ध लुकआउट नोटीस जारी

पोलिसांनी विरोधी खासदारांना घेतले ताब्यात

तसेच सिंधू नदीवर धरण बांधल्यास ते उडवून टाकण्याचा इशारा देखील त्यांनी दिला. “आम्ही भारत धरण बांधण्याची वाट पाहू आणि जेव्हा ते बांधतील तेव्हा ते दहा क्षेपणास्त्रांनी नष्ट करू. सिंधू नदी ही कोणत्याही भारतीय कुटुंबाची मालमत्ता नाही… आमच्याकडे क्षेपणास्त्रांची कमतरता नाही, अलहमदुलिल्लाह,”  असे मुनीर म्हणाले.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
342,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा