34 C
Mumbai
Sunday, March 8, 2026
घरक्राईमनामापाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याप्रकरणी राजस्थानमधून आणखी एकाला अटक!

पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याप्रकरणी राजस्थानमधून आणखी एकाला अटक!

जिल्ह्यात चौथ्या गुन्ह्याची नोंद 

Google News Follow

Related

पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या संशयावरून जैसलमेरमध्ये बुधवारी(२० ऑगस्ट) एका ३० वर्षीय व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले. संकडा परिसरातील जीवन खान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या व्यक्तीला मिलिटरी इंटेलिजेंस (एमआय) ने पकडले आणि नंतर कोतवाली पोलिसांच्या स्वाधीन केले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, खान पूर्वी जैसलमेरमधील लष्करी क्षेत्रातील एका रेस्टॉरंटमध्ये काम करत होता. मंगळवारी, त्याला आर्मी स्टेशनच्या आवारात प्रवेश करण्याचा प्रयत्न करताना रोखण्यात आले. संशयास्पद हालचालींमुळे त्याचा मोबाईल फोन तपासण्यात आला, त्यानंतर एमआय अधिकाऱ्यांनी त्याला ताब्यात घेतले, असे एएनआय वृत्तसंस्थेने वृत्त दिले आहे.

चौकशीदरम्यान, खानने कबूल केले की त्याचे नातेवाईक पाकिस्तानात आहेत. आता त्याला संयुक्त चौकशी केंद्रासमोर (JIC) हजर केले जाईल, जिथे अनेक सुरक्षा एजन्सी त्याची पुढील चौकशी करतील अशी अपेक्षा आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू असून, याप्रकरणात आणखी काही व्यक्तींशी संबंधित माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे, जैसलमेरमधील हेरगिरीशी संबंधित हा चौथा खटला आहे, ज्यामुळे सुरक्षायंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत.

यापूर्वी, १३ ऑगस्ट रोजी, चंदन फील्ड फायरिंग रेंजजवळील संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेच्या (डीआरडीओ) गेस्ट हाऊसमधील एका कंत्राटी व्यवस्थापकाला पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. महेंद्र प्रसाद असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव होते.

हे ही वाचा : 

“जय जयकार करा… महाराज झालेत नंबर वन!”

उत्तराखंडमध्ये अल्पसंख्यक शिक्षण विधेयक मंजूर

भारतातील रस्त्यांवर चालतात १४,३२९ इलेक्ट्रिक बस

लोकसभेत गोंधळ, विरोधकांनी प्रती फाडून केंद्रींय गृहमंत्र्यांकडे फेकल्या! 

राजस्थान सीआयडी (सुरक्षा) नुसार , उत्तराखंडमधील अल्मोडा येथील आरोपी महेंद्र प्रसाद हा सोशल मीडियाद्वारे पाकिस्तानी एजंट्सच्या संपर्कात होता. तो फायरिंग रेंजवर क्षेपणास्त्र आणि शस्त्रास्त्र चाचणीत सहभागी असलेल्या डीआरडीओ शास्त्रज्ञ आणि लष्करी अधिकाऱ्यांच्या हालचालींबद्दल संवेदनशील माहिती शेअर करत होता.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
297,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा