पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी कोलकात्यात मेट्रो रेलशी संबंधित अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांचे उद्घाटन करणार आहेत. या वेळी ते १३.६१ किलोमीटर लांबीच्या नव्याने उभारलेल्या मेट्रो नेटवर्कचे राष्ट्राला समर्पण करतील आणि तीन नवीन मार्गांवर मेट्रो सेवा सुरू करतील. पंतप्रधान मोदी जेसोर रोड–नोआपाडा ते जय हिंद विमानतळ मेट्रो सेवा याला हिरवा झेंडा दाखवतील. त्याचबरोबर ते सियालदह–एस्प्लेनेड मेट्रो सेवा आणि बेलघाटा–हेमंत मुखोपाध्याय मेट्रो सेवा ह्यांचाही शुभारंभ करतील.
याशिवाय, पंतप्रधान मोदी या तिन्ही मेट्रो विभागांसोबत हावडा मेट्रो स्थानकावरील नव्याने बांधलेला सबवे देखील उद्घाटन करतील. या नवीन सेवांमुळे कोलकात्यातील लाखो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. नोआपाडा–जय हिंद विमानतळ मेट्रो सेवा सुरू झाल्याने विमानतळापर्यंत पोहोचणे सोपे आणि जलद होईल. तर सियालदह ते एस्प्लेनेड प्रवासाचा वेळ सुमारे ४० मिनिटांवरून फक्त ११ मिनिटांवर येईल. याशिवाय, बेलघाटा–हेमंत मुखोपाध्याय मेट्रो सेवा कोलकात्याच्या आयटी हबला अधिक बळकटी देईल आणि रोजगाराच्या मोठ्या केंद्रांपर्यंत पोहोच सोपी करेल. या नवीन मेट्रो सेवांमुळे केवळ प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होणार नाही, तर शहरातील व्यस्त भागांमध्ये मल्टिमोडल कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत होणार आहे. या प्रकल्पांमुळे कोलकात्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला नवी दिशा मिळेल.
हेही वाचा..
बिहारची जनता मोदी-नीतीश यांच्यासोबतच !
भारतीय विमानवाहतूक उद्योगाचा ऑपरेटिंग नफा बघा किती होणार !
निशिकांत दुबे यांनी काँग्रेसला करून दिली इतिहासाची आठवण
लोकसभेत भाजप खासदार का संतापले ?
हेही लक्षात घेण्यासारखे आहे की, मार्च २०२४ मध्ये मोदींनी देशातील पहिल्या अंडरवॉटर मेट्रो सेवेला हिरवा कंदील दाखवला होता आणि हुगळी नदीखाली मेट्रो प्रवास केला होता. यावेळी पंतप्रधान ऑरेंज लाईन (न्यू गरिया ते विमानतळ) आणि ग्रीन लाईन (सेक्टर फाईव्ह ते हावडा मैदान) वरील विस्तारित सेवांचा शुभारंभ करतील. यापूर्वी पंतप्रधान मोदींनी न्यू गरिया ते रुबी (हेमंत मुखर्जी स्थानक) पर्यंत ऑरेंज लाईनची सेवा सुरू केली होती. आता ते रुबी ते बेलियाघाटा या टप्प्याचा शुभारंभ करणार आहेत. यामुळे ईएम बायपासवर न्यू गरिया ते बेलियाघाटा पर्यंत मेट्रो सेवा उपलब्ध होईल.







