33 C
Mumbai
Tuesday, February 3, 2026
घरराजकारणराहुल गांधी सीरियल लायर आहेत...

राहुल गांधी सीरियल लायर आहेत…

देवेंद्र फडणवीसांनी केली घणाघाती टीका

Google News Follow

Related

महाराष्ट्र निवडणुकीतील ‘मत चोरी’च्या आरोपांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधत म्हटले, “राहुल गांधी हे सिरीयल लायर आहेत. ते सतत खोटं बोलत राहतात. पण खोट्याची कुठलीही पायाभूत रचना नसते, ते फार काळ टिकत नाही.”

खोट्याच्या कपाळी गोटा

मुंबईत सोमवारी पत्रकार परिषदेत बोलताना फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रातील काही नेत्यांनाही असे स्वप्न पडत आहे की राहुल गांधीच बरोबर बोलत आहेत. त्यामुळे त्यांच्या खोट्यात आता स्थानिक नेत्यांचंही खोटं मिसळलं आहे. पण हे समजून घेतलं पाहिजे की खोट्याची पायाभूत रचना नसते आणि खोट्याचा किल्ला शेवटी कोसळतो.
“जोपर्यंत हे लोक हे ओळखत नाहीत की लोकांमध्ये जाऊन त्यांचा विश्वास जिंकून मतं मिळवावी लागतात, तोपर्यंत ते स्वतःला फसवत राहतील. खोटं बोलून कुणालाही काही फायदा होणार नाही,” असेही ते म्हणाले.

हे ही वाचा:

“उपराष्ट्रपतींच्या राजीनाम्याच्या चर्चा निराधार”

अबब…एक कोटींच्या बनावट चलनी नोटा सापडल्या

गाझा रुग्णालयावर इस्रायलच्या हल्ल्यात पत्रकारांसह १५ जणांचा मृत्यू!

अमित साटम भाजपचे नवे मुंबई अध्यक्ष!

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे) नेते आदित्य ठाकरे यांनीसुद्धा मत चोरीच्या मुद्द्यावर भाजपावर हल्ला चढवला. ते म्हणाले, “मत चोरीचा मुद्दा फक्त विरोधकांसाठी नाही, तर तो थेट सर्वसामान्य जनतेशी निगडित आहे. जर मतदारांचा हक्कच चोरीला जाणार असेल तर लोकशाहीचा अर्थ काय उरणार? सत्ताधारी आणि विरोधक दोघांसाठीही हा मुद्दा नुकसानकारक आहे.”

फक्त स्वतःला दिलासा देतायत

याआधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘मत चोरी’वर टीका केली होती. त्यावर फडणवीस म्हणाले, दिल बहलाने के लिए खयाल अच्छा है, गालिब… ते स्वतःलाच आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना दिलासा देत आहेत. स्वतःच्या पराभवाचं सत्य स्वीकारण्याऐवजी सगळं कटकारस्थानावर ढकललं जात आहे. पण जोपर्यंत ते आत्मपरीक्षण करत नाहीत, तोपर्यंत ते जिंकू शकत नाहीत. लोकांनी नरेंद्र मोदीजी आणि मलाच निवडलं आहे. जोपर्यंत ते जनतेचा अपमान करीत राहतील आणि खोटं बोलत राहतील, तोपर्यंत त्यांना विजय मिळणार नाही.”

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
290,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा