32.1 C
Mumbai
Thursday, October 22, 2026
घरविशेषनौदलासाठी तयार झाला भारताचा पहिला नेव्हल 3D एअर सर्व्हेलन्स रडार

नौदलासाठी तयार झाला भारताचा पहिला नेव्हल 3D एअर सर्व्हेलन्स रडार

Google News Follow

टाटा अॅडव्हान्स्ड सिस्टिम्स लिमिटेड (TASL) ने गुरुवारी जाहीर केले की, स्पेनच्या इंद्रा या कंपनीकडून तंत्रज्ञान हस्तांतरण (Technology Transfer) घेतल्यानंतर अत्याधुनिक नेव्हल ३D एअर सर्व्हेलन्स रडार तयार करणारी ती पहिली भारतीय कंपनी ठरली आहे. TASL ने सांगितले की, इटलीच्या कंपनीसोबत भागीदारी करून भारतीय नौदलाच्या युद्धनौकेवर पहिले लांझा-एन रडार यशस्वीरित्या तैनात करण्यात आले आहे.

लांझा-एन हे इंद्राच्या लांब पल्ल्याच्या 3D रडारचे नेव्हल व्हर्जन असून, जगभरात हवाई संरक्षण आणि क्षेपणास्त्रविरोधी मोहिमांसाठी सर्वाधिक प्रगत मानले जाते. पहिले रडार बसविल्यानंतर असे आणखी रडार भारतीय नौदलाच्या फ्रिगेट, डेस्ट्रॉयर आणि विमानवाहू युद्धनौकांवर बसविण्यात येणार आहेत. या रडारची स्थापना भारताच्या संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरता अभियानात एक मोठे पाऊल मानले जात आहे.

हेही वाचा..

नेपाळ सारखे जनआंदोलन भारतात व्हावं; तृणमूलचे आमदार बरळले

नेपाळ तुरुंगातून फरार ६० कैद्यांना सशस्त्र सीमा बलाने केली अटक!

मेंदू खाणाऱ्या अमीबामुळे आणखी एकाचा मृत्यू

चंदन तस्करांचा धुमाकूळ

ही प्रणाली स्थानिक पातळीवर असेंबल व एकत्रित करण्यात आली आहे. उत्पादन व भविष्यातील वितरणात गती आणण्यासाठी टाटा अॅडव्हान्स्ड सिस्टिम्सने कर्नाटकात स्वतंत्र रडार असेंब्ली, इंटिग्रेशन आणि टेस्टिंग सुविधा उभारली आहे. या रडारचा समावेश करण्यापूर्वी व्यापक समुद्री चाचण्या घेण्यात आल्या होत्या. विविध नौदल व हवाई प्लॅटफॉर्म्सवर त्याची क्षमता तपासली गेली आणि आता तो भारतीय नौदलाच्या युद्धनौकेवरील सर्व प्रणालींमध्ये पूर्णपणे एकीकृत करण्यात आला आहे.

या यशाबद्दल बोलताना टाटा अॅडव्हान्स्ड सिस्टिम्सचे CEO व एमडी, सुकरण सिंग यांनी सांगितले की, इंद्रासोबतची भागीदारी भारतातील रडार उत्पादन मजबूत करण्याच्या सामायिक बांधिलकीचे प्रतीक आहे. त्यांनी पुढे सांगितले की, स्थानिक तज्ज्ञता, सक्षम पुरवठा साखळी आणि तंत्रज्ञान हस्तांतरणामुळे प्रगत संरक्षण प्रणालींसाठी एक सशक्त इकोसिस्टम उभा राहतो आहे.

इंद्राच्या नेव्हल बिझनेस युनिटच्या प्रमुख, एना बुएंडिया यांनी सांगितले की, टाटासोबतचा सहकार्य फक्त रडार पुरवठ्यापुरता मर्यादित नाही. त्यांनी म्हटले, “आम्ही मिळून बेंगळुरूमध्ये एक रडार फॅक्टरी उभारली आहे. त्यामुळे आम्हाला प्रणाली अधिक कार्यक्षमतेने तयार करता येतील आणि ग्राहकांना स्थानिक स्तरावर त्वरित सेवा पुरवता येईल.” लांझा-एन रडार मित्र व शत्रू अशा दोन्ही प्रकारच्या हवाई व पृष्ठभागावरील लक्ष्यांवर लक्ष ठेवू शकतो. यामध्ये ड्रोन, सुपरसॉनिक लढाऊ विमाने, अँटी-रेडिएशन क्षेपणास्त्रे आणि नौदलाचे प्लॅटफॉर्म्स यांचा समावेश होतो. हे प्रथमच आहे की लांझा-एन प्रणाली स्पेनच्या बाहेर तैनात करण्यात आली असून, त्यामुळे इंद्राच्या मूळ देशाबाहेर ती चालवणारा भारत हा पहिला देश ठरला आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
339,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा