28.1 C
Mumbai
Saturday, October 17, 2026
घरदेश दुनिया“भारतावर अतिरिक्त कर लादणे म्हणजे उंदराने हत्तीला मारल्यासारखे” अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ असं का...

“भारतावर अतिरिक्त कर लादणे म्हणजे उंदराने हत्तीला मारल्यासारखे” अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ असं का म्हणाले?

ट्रम्प यांच्या निर्णयांमुळे भारत- अमेरिका संबंध ताणलेले

Google News Follow

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर अतिरिक्त कर लावला याशिवाय H-1B व्हिसावर प्रतिवर्षाला ८८ लाख रूपये शुल्क आकारून नव्या अडचणी उभ्या केल्या आहेत. यामुळे दोन्ही देशांमधील तणाव वाढला आहे. दरम्यान, अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ आणि विश्लेषक यांनी मात्र ट्रम्प यांच्या निर्णयांवरून त्यांना घराचा आहेर दिला आहे. अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ रिचर्ड वोल्फ यांनी नवी दिल्लीवर लादलेल्या ट्रम्प यांच्या शुल्कांवर टीका केली आहे. ते म्हणाले की, अमेरिका असे निर्णय घेऊन स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेत आहे.

ट्रम्प यांच्या धडाकेबाज निर्णयांमुळे भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध बिघडले असून यासंदर्भात रिचर्ड यांनी एका पॉडकास्टद्वारे आपले विचार मांडले आहेत. त्यांनी सांगितले की, चीनसारखे देश सतत देशातून निधी काढून घेत असल्याने अमेरिकेची आर्थिक परिस्थिती सतत बिघडत आहे. अर्थव्यवस्था कर्जावर चालवू शकत नाही. रिचर्ड यांच्या मते, जागतिक आर्थिक उत्पादनाच्या बाबतीत ब्रिक्स देशांच्या गटाने आता जी- ७ ला मागे टाकले आहे.

रिचर्ड म्हणाले की, हा जगासाठी एक ऐतिहासिक क्षण आहे की अमेरिका आणि त्याचे सहयोगी देश अशा गटाचा भाग आहेत ज्यांचा जागतिक उत्पादनात फारसा वाटा नाही. जर तुम्ही चीन, भारत, रशिया आणि उर्वरित ब्रिक्स देशांना एकत्र घेतले तर ते जागतिक उत्पादनात सुमारे ३५ टक्के वाटा देतात, तर दुसरीकडे जी- ७ देशांचा वाटा फक्त २८ टक्के आहे, असे ते म्हणाले. तसेच रिचर्ड यांनी या बदलत्या जागतिक वातावरणाच्या केंद्रस्थानी भारत आणि चीनला ठेवले. ते म्हणाले की, अमेरिकेच्या आक्षेपांना न जुमानता भारत आणि चीनने रशियन तेलाची सतत खरेदी करणे हे दर्शविते की सत्ता कुठे सरकत आहे. संयुक्त राष्ट्रांच्या शब्दात सांगायचे तर, तुम्हाला जगातील सर्वात मोठ्या देशाला, सर्वात मोठ्या लोकशाही असलेल्या भारताला काय करावे आणि काय करू नये हे सांगायचे आहे? हे उंदराने हत्तीला मारल्यासारखे आहे.

हेही वाचा..

गरीब, मध्यमवर्गीय, युवा, शेतकरी, महिलांना जीएसटी सुधारांचा फायदा

जयशंकर यांची फिलिपिन्सच्या परराष्ट्र सचिवांशी भेट

ऑपरेशन सिंदूरनंतर सुरू केलेल्या ड्रोन वॉरफेअर स्कूलमधील पहिली बॅच लवकरच होणार पदवीधर

बिहारमध्ये ५ ते १५ नोव्हेंबरदरम्यान तीन टप्प्यात निवडणुकीची शक्यता!

रिचर्ड म्हणाले की ट्रम्प प्रशासनाने भारतावर लादलेल्या शुल्कांवरून हे स्पष्ट होते की ही पावले भारत आणि इतर सदस्य देशांना एकमेकांच्या जवळ आणू शकतात. जर तुम्ही उच्च शुल्क लादून अमेरिकेचा भारताकडे जाणारा मार्ग बंद केला तर भारताला त्यांची निर्यात विकण्यासाठी इतर पर्याय शोधावे लागतील. तुम्ही ब्रिक्सला पश्चिमेला एक नवीन पर्याय बनण्यासाठी सक्षम करत आहात.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
338,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा