26 C
Mumbai
Sunday, March 1, 2026
घरविशेषछत्तीसगड: १४ लाख रुपयांचे बक्षीस असलेले तीन नक्षली ठार!

छत्तीसगड: १४ लाख रुपयांचे बक्षीस असलेले तीन नक्षली ठार!

अनेक शस्त्रे जप्त

Google News Follow

Related

छत्तीसगडमधील कांकेर जिल्ह्यात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत रविवारी (२८ सप्टेंबर) तीन नक्षलवादी ठार झाले. कांकेर आणि गरियाबंद जिल्ह्यांच्या सीमेजवळील रावसच्या जंगलात ही चकमक झाली, अशी माहिती एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने पीटीआय वृत्तसंस्थेला दिली.

ठार करण्यात आलेल्या तीन नक्षलवाद्यांवर १४ लाख रुपयांचे बक्षीस होते. कांकेरचे एसएसपी आयके एसलिसेला यांनी सांगितले की, कांकेर आणि गरियाबंद जिल्ह्यातील सुरक्षा दल चकमकीत उपस्थित होते. कांकेर आणि गरियाबंद येथील डीआरजींसह बीएसएफ जवानांचे एक संयुक्त पथक आज सकाळी नक्षलविरोधी कारवाईसाठी निघाले. पथक तिर्यारपाणीच्या जंगलात पोहोचताच सैनिक आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली. परिसरात शोध मोहीम राबवण्यात आली आणि घटनास्थळावरून तीन नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले. यामध्ये एका महिला नक्षलीचा समावेश आहे.

एसएसपी आयके एलिसेला म्हणाले की, घटनास्थळावरून नक्षलवादी शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. या शस्त्रांमध्ये एसएलआर रायफल्स आणि नक्षलवादी साहित्याचा समावेश आहे. सुरक्षा दलांच्या यशानंतर, बस्तर महानिरीक्षकांनी माध्यमांशीही संवाद साधला. त्यांनी नक्षलवाद्यांना आत्मसमर्पण करण्याचे आवाहन केले.

नक्षलवाद्यांनी हे स्वीकारले पाहिजे की माओवाद नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. सरकारच्या पुनर्वसन धोरणाचा फायदा घेत हिंसाचार सोडून मुख्य प्रवाहात सामील होण्याची वेळ आली आहे. जर त्यांनी त्यांच्या बेकायदेशीर आणि हिंसक कारवाया सुरू ठेवल्या तर त्यांना गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, असे सुंदरराज पी (बस्तर आयजी) यांनी म्हटले. 

हे ही वाचा : 

टीव्हीके रॅलीत ४० जणांचा मृत्यू, विजयच्या वरिष्ठ सहकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल!

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांत महिलांचे महत्त्वाचे योगदान

मिथुन मन्हास यांची बीसीसीआयचे नवे अध्यक्ष म्हणून निवड!

जैश, लश्कर आणि हिजबुलवर पाकिस्तान सैन्याचं थेट नियंत्रण

  1. नक्षलवादी राजेश उर्फ ​​राकेश हेमला, ACM, नागरी एरिया कमिटी/गोबरा LOS कमांडर, ५ लाखांचे बक्षीस
  2. नक्षलवादी सरवन मडकम उर्फ ​​विश्वनाथ उर्फ ​​बुधराम पुनेम, ACM, सीतानदी/रावस समन्वय क्षेत्र समितीचे सचिव, ८ लाखांचे बक्षीस. 
  3. महिला नक्षलवादी बसंती कुंजम उर्फ ​​हिडमे, समन्वयक, प्रोटेक्शन टीम, मैनपूर नुआपाडा सदस्य, एक लाख रुपयांचे बक्षीस, अशी ठार झालेल्या नक्षलवाद्यांची नावे आहेत. 

 

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
296,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा